कापरेकर स्थिरांकाची जादू अनुभवून पाहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 06:00 AM2020-05-28T06:00:00+5:302020-05-28T06:00:07+5:30
6174 हेच उत्तर
- मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
साहित्य:
कागद, पेन किंवा पेन्सिल.
कृती :
1. एक चार अंकी संख्या घ्या. अट एकच चारही अंक एक सारखे नकोत.
2. शून्य असले तरी चालेल.
3. या चार अंकी संख्येतले अंक उतरत्या क्रमाने लावा ती संख्या कागदावर लिहा.
4. हेच चार अंक चढत्या क्रमाने लावा आणि ही संख्या आधीच्या संख्येतून वजा करा.
5. वजाबाकी चार अंकी येईल.
6. ही चार अंकी संख्या घेऊन त्यातले चार अंक उतरत्या क्रमाने लावा ती संख्या कागदावर लिहा.
7. हेच चार अंक चढत्या क्रमाने लावा आणि ही संख्या आधीच्या संख्येतून वजा करा.
8. असे करत करत एक वेळ अशी येईल की तुम्हाला 6174 हेच उत्तर मिळेल.
9. 6174 या क्रमांकाला कापरेकर स्थिरांक म्हणतात