केनेथ शिनोझुका , त्याला भेटा त्याचं  डोकं सुसाट चालतं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 03:30 PM2020-05-04T15:30:02+5:302020-05-04T15:31:24+5:30

त्याने त्याच्या आजारी आजोबांसाठी एक फार भारी गोष्ट केलीये..

kenneth shinozuka - meet this boy at ted talk | केनेथ शिनोझुका , त्याला भेटा त्याचं  डोकं सुसाट चालतं !

केनेथ शिनोझुका , त्याला भेटा त्याचं  डोकं सुसाट चालतं !

Next
ठळक मुद्देआज तुम्ही काहीतरी बघणारच, तर काय बघाल?

जगभर मुलं काय काय धमाल गोष्टी करत असतात. कुणाला कशातून प्रेरणा मिळेल सांगता येत नाही. कुणी पर्यावरण रक्षणाचा विडा उचलतं तर कुणी स्वत:च्या आजारावर मात करतं आणि हे सगळं लहान मुलंच करतात बरं का! तुमच्यासारखीच. 
तर आजची गोष्ट आहे केनेथ शिनोझुका या मुलाची. केनेथच्या आजोबांना अल्झायमर होता. अल्झायमर हा एक प्रकारचा विस्मृतीचा आजार आहे. यात ज्यांना हा आजार होतो त्यांना दिवसेंदिवस विस्मरण व्हायला लागतं. इतकं की जवळच्या माणसांनाही ते ओळखेनासे होतात. त्यांची काळजी घेणंकठीण होऊन बसतं. ही माणसं वेळीअवेळी घराबाहेर पडातात आणि मग घराचा पत्ता विसरून जातात. घर न सापडल्याने हरवतात. 
केनेथच्या आजोबांच्या बाबतीतही असं सगळं होत होतं. यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे असं त्याला वाटत होतं. पण करायचं काय? म्हणून मग केनेथने एक प्रेशर सेन्सर तयार केलं. जे आजोबांच्या पलंगापाशी ठेवता येईल जेणोकरून त्यावर आजोबांचा पाय पडला तर त्यांची काळजी घेणा?्या व्यक्तीच्या स्मार्टफोनमध्ये अलर्ट वाजेल आणि त्या व्यक्तीला आजोबा उठले आहेत हे समजू शकेल. 


केनेथला स्मृतिभ्रंश झालेल्या लोकांसाठी  ंरुग्णांची नीट काळजी घेता येईल. यासाठी त्याने प्रचंड अभ्यास आणि संशोधनही केलं आहे. ते त्याने टेड टॉक मध्ये सविस्तर मांडलं आहे. 
केनेथ चा हा टेड टॉक तुम्हाला गुगलवर मिळेल. केनेथ काय म्हणतोय नक्की बघा. 

त्यासाठी गुगलवर जाऊन kenneth shinozukaÔ  असं इंग्लिशमध्ये टाईप करा.

Web Title: kenneth shinozuka - meet this boy at ted talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.