Kids play @ home : तुमचे सॉक्स सतत हरवतात ? -मग ही घ्या जादूची कांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 08:19 PM2020-04-01T20:19:18+5:302020-04-01T20:22:24+5:30
स्वत:च्या वस्तू प्रचंड मोठय़ा ढिगा-या त हरवू नयेत म्हणून एक खासमखास आयडिया
आई कपाट आवरण्यावरून सतत ओरडत असते ना? आता सुट्टी आहे तर कपाट आवरायला घ्या. कपाट आवरताना सगळ्यात गोंधळ होतो तो छोटय़ा गोष्टींचा. रुमाल, आतले कपडे, सॉक्स, हेअर बँड्स या गोष्टी कपाटातल्या अकोंबाकोंबीत अजिबात सापडत नाहीत. म्हणूनच अरू शकता. या प्रत्येकासाठी मस्त डिझायनर बॉक्सेस बनवा. आणि कपाट आवरताना या बॉक्सेसना व्यवस्थित जागा करून त्यात वस्तू नीट ठेवा. म्हणजे हरवणार नाहीत आणि चटकन सापडतील.
साहित्य :
नव्या चपला बुटांचे, वस्तूंचे बॉक्स, पोस्टर कलर्स, ब्रश,
कात्री, सेलो टेप
कृती :
1. बॉक्सेसच्या वरच्या बाजूचे चारही फोल्ड्स कापून टाका. म्हणजे बॉक्स वरच्या बाजूने खुला होईल.
2. खालच्या बाजूने सेलो टेपने व्यवस्थित बंद करून टाका म्हणजे बॉक्स खालून उघडला जाणार नाही.
3. बॉक्सवर जर काही प्लॅस्टिक असेल तर ते काढा कारण प्लॅस्टिकवर नीट रंग चढत नाही.
4. आता बॉक्सला तुमच्या आवडीच्या रंगाने रंगवा.
5. त्यावर डिझाइन्स काढा. चित्र काढा.
6. बॉक्स पूर्णपणे वळला की मग त्यात वस्तू नीट रचून ठेवा.
7. आणि हा बॉक्स कपाट आवरताना आतमध्ये ठेवून द्या.
7. दरवेळी कपडे धुवून आले की या बॉक्समधल्या वस्तू
पुन्हा बॉक्समध्येच जातील याची काळजी घ्या.