कुठलंही अँप डाउनलोड करायचं तर बाबा नाही म्हणतो, असं  का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 08:00 AM2020-05-02T08:00:00+5:302020-05-02T08:00:07+5:30

तुम्ही काय डाऊनलोड करताय, हे आईबाबांना सांगा! त्यांच्यापासून लपवायचं नाही.

kids screentime- why downloding app you shuould take care. | कुठलंही अँप डाउनलोड करायचं तर बाबा नाही म्हणतो, असं  का ?

कुठलंही अँप डाउनलोड करायचं तर बाबा नाही म्हणतो, असं  का ?

Next
ठळक मुद्देअँप डाऊनलोड करण्यापूर्वी..

मोबाईल अँप्समध्ये खूप भारी भारी प्रकार असतात. पण कुठलंही अँप डाउनलोड करायचं तर बाबा नाही म्हणतो. डाउनलोड करण्याआधी काय काय तपासून बघायला हवं? - ईशान पारनेरकर, नागपूर 

ईशान काही गोष्टी लक्षात ठेव. त्या फार महत्वाच्या आहेत :
1. कुठलाही ऑनलाईन गेम डाउनलोड करण्याआधी त्याच रेटिंग बघ. ते 4 किंवा अधिक असलंच पाहिजे. शिवाय ते रेटिंग काही हजार लोकांनी दिलेलं असलं पाहिजे. पाच-पन्नास लोकांत 4 किंवा अधिक रेटिंगला अर्थ नसतो. अँप चालावं म्हणून बनवणारेही असं रेटिंग निर्माण करू शकतात. त्यामुळे रेटिंग, किती लोकांनी अँप डाउनलोड केलंय ते तपास.
2. माहित नसलेला, विशेष प्रसिद्ध नसलेला गेम कधीही डाऊनलोड करू नकोस.डाऊनलोड करताना समजा काहीतरी अनावश्यक माहिती मागितली जातेय असं वाटलं तर डाउनलोडिंग तिथल्या तिथे बंद कर. .
3. गेम किंवा अँप डाउनलोड करण्यापूर्वी रेटिंग बरोबर रिव्ह्यूज पण वाच. वापरणा?्या किंवा ज्यांनी गेम / अँप डाउनलोड केलेलं आहे अशा लोकांनी त्यांचे अनुभव लिहिलेले असतात. त्यातून गेम / अँपची माहिती आणि वापराबद्दलचा इतरांचा अनुभव समजू शकतो. ज्यावरून ते अँप डाउनलोड करायचं कि नाही हे ठरवता येऊ शकतं.
4. अनेकदा अँप डाउनलोड केलं कि सतत जाहिरातींचा मारा सुरु होतो. काहीवेळा या जाहिराती चुकीची माहिती देणा?्या, चुकीच्या साईट्सच्याही असू शकतात. त्यामुळे अशी अँप्स लगेच फोनमधून काढून टाक. कारण अशा अँप्समुळे तुमचा फोन आणि तुम्ही धोक्यात येऊ शकता.


5. एखादं अँप तुला भारी वाटलं पण आईबाबांनी डाउनलोड करायला परवानगी दिली नाही तर त्यांच्याशी भांडू नकोस. उलट त्यात काय धोका असू शकेल ते विचार. 
6. तू जे काही डाउनलोड करणार आहेस त्याची माहिती तू स्वत: आईबाबांना दे. अशीच सवय लावून घे. ते खूप महत्वाचं आहे. त्याच्या अपरोक्ष कुठलीही गोष्ट आपण का करावी, नाही का? 
 

Web Title: kids screentime- why downloding app you shuould take care.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.