चलो चॅम्प , बनो जम्पिंग जॅक्स..हे धुडूम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 04:42 PM2020-04-19T16:42:25+5:302020-04-19T16:50:30+5:30
lockdown :DIY- exercise for kids jumping jacks. stay at home.
बसला ना ओरडा आज आई-बाबांचा? अरे उडय़ा तरी किती मारायच्या! बरं मारल्या जमिनीवर एकवेळ, तर ठीक आहे. गाद्यांवर, सोफ्यावर, बेडवर, पलंगावर. इथेही उडय़ा? मग ओरडा बसणार नाही तर काय? पण आज मी तुम्हाला एक अशी भारी आयडिया सांगणार आहे, त्यामुळे उडय़ा मारायची तुमची इच्छा तर पूर्ण होईलच, आई-बाबाही रागावणार नाहीत आणि फुकटात व्यायामही होऊन जाईल!
आज आपल्याला उडय़ाच मारायच्या आहेत, पण थोडय़ा वेगळ्या प्रकारच्या. या उडय़ांचं नाव आहे ‘जम्पिंग जॅक्स’!
कशा माराल या उडय़ा?
1- सरळ उभे राहा. छाती ताठ. हात शरीराच्या बाजूला.
2- गुडघे थोडेसे वाकवा आणि मारा आता वर हवेत उडी.
3- पण नुसतीच नाही उडी मारायची. उडी मारताना वर जात असतानाच आपले दोन्ही हात आणि दोन्ही पायही एकाच वेळी साईडने वर गेले पाहिजेत.
4- आपली उडी खाली येताना, पुन्हा आपण मूळ पोङिाशनला आलं पाहिजे.
5- यातला महत्त्वाचा भाग म्हणजे उडय़ा मारत असलो, तरी या उडय़ा धसमुसळ्या, गादी, सोफ्यावर मारतो, तशा नको. या उडय़ा अगदी स्मूदली झाल्या पाहिजेत.
6- विशेषत: आपली उडी खाली येत असताना ते आपल्या शरीरावर किंवा ढुंगणावर जोरात आपटायला नको. ते हलकेच खाली आले पाहिजेत.
7- उडय़ा मारत असलो, तरी आपल्यावर आपला कंट्रोल असला पाहिजे. एकही उडी वेडीवाकडी जाता कामा नये.
हीच तर यातली गंमत आहे. बघा मारून या उडय़ा. यात आणखीही काही प्रकार आपल्याला करता येतात. पण ते आपण नंतर पाहू. तुमचे तुम्हालाही ते शोधून काढता येतील.
यामुळे आपल्या शरीराच्या ब:याच अवयवांना व्यायाम मिळतो. हात, पाय, पोट. या उडय़ांमुळे वजन आटोक्यात राहातं. चयापचय क्रिया सुधारते. हार्ट मजबूत होतं.
मारा आता या उडय़ा हव्या तेवढय़ा. हो, पण सुरुवातीला किती? फक्त दहा. मग हळूहळू वाढवत न्या. आणि मग करा माङयाशी कॉम्पिटिशन!
- तुमचीच ‘जम्पिंग जॅक’ ऊर्जा