ऍक्टिव्हिटी बबल्स हवेत तर उडवले, पण बबल्सचं चित्र काढलं का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 07:00 AM2020-05-18T07:00:01+5:302020-05-18T07:05:01+5:30
स्ट्रॉ ने ह्वेचे बुडबुडे उडवले असतीलच तुम्ही, पण आता चित्र रंगवा!
तुम्हाला कोल्ड्रिंक च्या बाटलीत स्ट्रॉ घालून बुडबुडे काढायला आवडत? किंवा कोल्ड्रिंक संपल्यावर बाटलीच्या तळाशी असलेलं कोल्ड्रिंक पिताना फुरफूर आवाज काढायला आवडतं? मग तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी खूप आवडेल.
साहित्य:
चार छोटे बाऊल्स, कुठलेही चार रंग, पाणी, चार स्ट्रॉ, तीन चार पांढरे कागद
कृती:
1. चारही बाऊल्स मध्ये अर्धा कप पाणी घ्या. आणि प्रत्येक बाउल मध्ये एक एक रंग 2 टेबलस्पून घाला. तुमच्याकडे टेबलस्पून नसेल तर मोठा चमचा वापरा.
2. आता पाणी आणि रंग व्यवस्थित एकत्र करा.
3. एक स्ट्रॉ घ्या, ती एका बाऊलमध्ये बुडवा आणि तोंडाने स्ट्रॉ मध्ये हवा सोडत बाउलमधल्या रंगाचे बुडबुडे तयार करा.
4. हे करत असताना स्ट्रॉ ने पाणी तोंडात ओढून घ्यायचं नाही. फक्त स्ट्रॉ ने बाउल मधल्या पाण्यात हवा सोडायची.
5. छान बुडबुडे आले की स्ट्रॉ हळूच काढून घ्या, पांढरा कागद या बुडबुड्यांवर ठेवा आणि कागदावर ठसा घ्या.
6. असंच सेम उरलेल्या तीन रंगांचं करा. ठसे घेताना कागदावर काही ठसे लांब लांब काही जवळ, काही एकमेकांवर असे घ्या. म्हणजे त्यातून मस्त डिझाइन तयार होईल.
बुडबुड्यांचे ठसे कागदावर मस्त दिसतात. यासाठी शक्यतो लाल, निळा, हिरवा, पिवळा, केशरी, जांभळा असे रंग वापरा. काळा, दाट हिरवा, चॉकलेटी असे रंग टाळा, म्हणजे तुमचं चित्र सुंदर आणि ब्राईट दिसेल.