केर काढा, त्यात पण खूप मज्ज असते! - try तो मारो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 07:44 AM2020-04-11T07:44:52+5:302020-04-11T07:47:15+5:30
दुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग
आज आपल्याला चित्र काढायचं नाहीये, हस्तकला, स्वयंपाक करायचा नाहीये तर आज आपल्याला भांडी घासायची आहेत. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन? नवीन काहीच नाही खरंतर. गांधीजी म्हणायचे प्रत्येकाने आपापलं काम केलं पाहिजे. आपलं काम आपल्यासाठी दुसयार्ने कशाला करायचं.
म्हणजे बघा, एरवी मदत मावशी येतात घरी, त्या झाडू, फारशी पुसणं, भांडी धुणं असं सगळं काम करतात. आईबाबा त्यांच्या त्यांच्या कामात बिझी असतात. तुम्ही शाळा आणि अभ्यासात. पण कोरोनामुळे मदत मावशी पण येऊ शकत नाहीयेत. आईबाबांचं वर्क फ्रॉम होम सुरु आहे. म्हणजेच ते घरात असले तरी काम चालूच आहे. तुमची शाळा नाहीये नि अभ्यास पण नाहीये. मग सारा वेळ टीव्हीसमोर बसून घालवण्यापेक्षा थोडं काम केलं तर?
तुम्ही रोज उठून घरात हा धुडगुस घालताय सध्या, तुम्हाला कल्पना तरी आहे का की तुमच्या आईच्या कमरेचा काटा कसा आणि किती ढिला होतो तुम्ही केलेला पसारा आवरताना ते!
म्हणून आजचं डी आय वाय आहे : आईला मदत करणो!
आणि मुख्य म्हणजे केर काढणो!
डी आय वाय म्हणजे काही दर वेळी चित्र, हस्तकलाच असायला हवं असं कुठेय.
डू इट युअरसेल्फ मध्ये आपल्या घरातला केर आपण काढणंही आलंच की! काय??