भाज्या वाळवून कुणी खातं का? - तर हो, करुन पहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 07:55 AM2020-05-01T07:55:00+5:302020-05-01T07:55:06+5:30

दर वेळी आई आणि आजीनेच का करायची वाळवणं? - यावेळी तुम्हीही करा.

lockdown - DIY - dry- dihydreted vegitables for cooking. | भाज्या वाळवून कुणी खातं का? - तर हो, करुन पहा.

भाज्या वाळवून कुणी खातं का? - तर हो, करुन पहा.

Next
ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

तुमच्यापैकी अनेकांच्या घरात वाळवणं सुरु असतील. म्हणजे दर वर्षी ज्या जोमात चालतं तितकं नसेल यंदा, पण थोडं फार जे घरात उपलब्ध साहित्य आहे त्यातून आईने काही ना काही वाळवणं केलीच असतील. आता तुम्हीही तुमची खास वाळवणं करा. 

म्हणजे काय करायचं?
1) घरात कुठल्या कुठल्या भाज्या आणि फळं आहेत ते आईबाबाला विचारा. 
2) प्रत्येक भाजीतला एक नग आणि एक फळ घ्या. 
3) त्या भाज्या अंडी फळं पाण्याने स्वच्छ धुवा. पुसा. 
4) आईबाबांना मदतीला घ्या, आणि त्याचे पातळ काप चिरा. 
5) आता सगळ्या चिरलेल्या फोडी उन्हात वळवायला ठेवा. 
6) यात तुम्ही बटाटे, कांदे, भेंडी, गाजर, टोमॅटो, सफरचंद, द्राक्ष, पेरू, चिक्कू किंवा ज्या फळं आणि भाज्या घरात आहेत त्यातलं काहीही वापरू शकता. 
7) फळं आणि भाज्या चांगल्या खुटखुटीत वाळल्या कि डब्यामध्ये भरून ठेवा. 


8) फळं तशीच येताजाता तोंडात टाकून वाळलेल्या भाज्या तळून त्यावर तिखट मीठ, चाट मसाला घालून खाऊ शकता. 
9) दर वेळी आई आणि आजीनेच का करायची वाळवणं यावेळी तुम्हीही करा. 


 

Web Title: lockdown - DIY - dry- dihydreted vegitables for cooking.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.