स्लो सायकलिंग करता का ? ते पण इनडोअर - फन  मोअर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 12:26 PM2020-04-17T12:26:38+5:302020-04-17T12:28:27+5:30

मी सायकल काढायला सांगितली म्हणजे एकदम बाहेर, रस्त्यावर नाही काढायची!

lockdown-Diy _ exercise at home- learning activity-stay at home. | स्लो सायकलिंग करता का ? ते पण इनडोअर - फन  मोअर !

स्लो सायकलिंग करता का ? ते पण इनडोअर - फन  मोअर !

Next
ठळक मुद्देया खेळामुळे तुमचा सायकलवरचा होल्ड, बॅलन्स जबरदस्त वाढेल. एकाग्रता वाढेल.

 घरी बसून बसून एकदम बोअर झालंय. व्यायाम तरी किती करायचा, असं झालंय  तुम्हाला? ठीक आहे, मग आज आपण एक एकदम मजेचा खेळ खेळू. या खेळाची मजा म्हणजे यात तुम्ही तुमचे आई-बाबा, दादा-ताई अगदी सगळ्यांना सहभागी करून घेऊ शकता!
तुमच्यापैकी ब:याच जणांकडे सायकली असतीलच. तुमची स्वत:ची नसेल, तर दादाची,  ताईची अशी कोणाची तरी असेलच ना?
काढा ही सायकल. आधी स्वच्छ पुसून काढा. बरेच दिवस झालेत ती धूळ खात पडली असेल ना? हो, मी सायकल काढायला सांगितली म्हणजे एकदम बाहेर, रस्त्यावर नाही काढायची! आपला हॉल जर मोठा असेल, तर हॉलमध्ये ही सायकल आणा. नाहीतर बेस्ट वे म्हणजे सरळ गच्चीवर न्या. पण आधी त्यासाठी आईबाबांची परवानगी घ्या. टेरेसचे कठडे व्यवस्थित उंच आहेत ना, ते बघा. आईबाबांनी परवानगी दिली तरच वर न्या सायकल. पण लक्षात घ्या, तिथेही उगाच गर्दी करायची नाही.
कशी चालवायची ही सायकल?
1- ही आहे स्लो सायकलिंग.
2- म्हणजे अतिशय हळू सायकल चालवायची
3- जसं काही आपण जागेवरच उभं आहोत.
4- तुम्ही सगळेच भारी सायकलिस्ट आहात, हे मला माहीत आहे, पण स्लो सायकलिंग तुम्ही कधी केलं नसेल.
5- या खेळाचं वैशिष्टय़च हे आहे, कुठेही तुम्ही ही सायकलिंग करू शकता.
6- लक्षात ठेवा, फास्ट सायकलिंग करणं एकवेळ सोपं आहे, पण स्लो सायकलिंग फार म्हणजे फार अवघड आहे. 
7- पाय न टेकवता एक मिनिट अशी सायकल चालवणं आणि कमीत कमी अंतर कापणं ही फार म्हणजे फार अवघड गोष्ट आहे. 
लक्षात ठेवायचा, आणखी एक नियम म्हणजे पडायचं नाही. सायकलिंगचं हेल्मेट असेल, तर ते अवश्य वापरा. इतर वेळी बाहेर जातानाही हेल्ेमेट अत्यावश्यक आहे. या खेळामुळे तुमचा सायकलवरचा होल्ड, बॅलन्स जबरदस्त वाढेल. एकाग्रता वाढेल. मसल्स पॉवर वाढेल. स्ट्रेस लेवल तर कमी होईलच, पण फार मज्जाही येईल.
- तुमचीच ‘सायकलवाली’ फ्रेण्ड ऊर्जा

Web Title: lockdown-Diy _ exercise at home- learning activity-stay at home.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.