केमिकल खाऊ! रोज आपण किती रसायनं खातो? - चला मोजूया!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 10:32 AM2020-04-11T10:32:56+5:302020-04-11T10:39:54+5:30
ते बारकाईने पाहा आणि मोजा. तुम्हाला चक्कर येऊ शकेल!
- मराठी विज्ञान परिषद
काही दशकापूर्वी दात घासण्याकरता बाभूळ किंवा कडूनिंबाची काडी वापरल्या जात असे. पुढे त्याची जागा दंतमंजनाने घेतली. आता तर अनेक प्रकारच्या टूथ पेस्ट बाजारात मिळतात. नैसर्गिक वस्तू मागे पडली व आता अनेक मानव निर्मित रसायनांपासून निर्माण झालेली टूथ पेस्ट आपल्या दिवसाची सुरवात करते.
अनेक प्रकारच्या टूथ पेस्ट मध्ये 5क् च्या वर रसायने असतात. अर्थातच यातली बहुतांश रसायने पाण्याबरोबर वाहत जाऊन जलस्नेतांना जाऊन मिळतात व प्रदूषण करतात. ह्या मानव निर्मित रसायनाचे पुढे जलस्नेतात काय होते हा संशोधनांचा विषय आहे. मात्र तो आपल्या बदलत्या जीवन शैलीचा हा एक दुष्परिणाम नक्कीच आहे.
चला शोधू या आपण दररोज किती रसायने वापरतो.
आपल्या घरात दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या साहित्यावर त्यात कोणती रसायने आहेत हे लिहिलेले असते.
ते बारकाईने पाहा आणि मोजा.
तुम्हाला चक्कर येऊ शकेल!