आबरा का डाबरा .. ये देखो ग्लास गायब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 03:10 PM2020-04-27T15:10:07+5:302020-04-27T15:11:48+5:30
ग्लास अदृश्य करूया? .. पण हे कसं शक्य आहे?
- राजीव तांबे
साहित्य :
एक मोठे काचेचे भांडे. 2 लीटर तेल. (शेंगदाणा किंवा सूर्यफूल तेल). 2 लीटर पाणी. एक काचेचा ग्लास. 2 चमचे.
ही जादू सुरू करण्यापूर्वी सर्व प्रेक्षकांना काचेच्या भांड्याच्या समोर बसवा.
तर मग करा सुरु :
1. एका काचेच्या मोठ्या भांड्यात पाणी घाला. त्यात काचेचा ग्लास सोडा. ग्लास बुडेल. ग्लास दिसेल.
2. आता काचेचे भांडे रिकामे करा. स्वच्छं पुसुन घ्या.
3. काचेच्या भांड्यात दोन लिटर तेल घाला. त्यात सावकाश तो ग्लास सोडा.
4. समोरुन पाहिलं तर ग्लास अजिबात दिसणार नाही.
प्रेक्षकांना वाटेल ग्लास अदृश्य झाला आहे!
असं का होतं :
1. पाण्याच्या भांड्यात ग्लास ठेवला असताना ग्लासाकडून येणारे प्रकाशकिरण, पाण्यातून आणि मग काचेतून आपल्यापयर्ंत पोहोचतात. तेव्हा वक्रीभवन होतं.
2. म्हणजेच थोडक्यात, प्रकाशाचा वेग प्रत्येक माध्यमात वेगळा असतो. एका माध्यमातून दुसर्?या माध्यमात प्रवेश करताना प्रकाशाचे वक्रीभवन होते.
3. ग्लास पाण्यात असताना ग्लासाच्या प्रत्येक कणाकडून वक्रीभवन होते आणि आपल्याला ग्लास स्पष्ट दिसतो.
4. काचेतून आणि तेलातून जाताना प्रकाशाचा वेग एकच आहे. त्यामुळे ग्लासाकडून आलेले प्रकाशकिरण वक्रीभवन न होता आपल्या डोळ्यापयर्ंत पोहोचतात
त्यामुळे आपल्याला ग्लास दिसत नाही.