पाण्याने  कधी  कागद चिकटतो  का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 07:35 AM2020-04-24T07:35:00+5:302020-04-24T07:35:01+5:30

हे कसं काय होतं? पाण्याने कागद चिकटवण्याचा खेळ

lockdown : DIY - fun activity for kids -paper & water -stay at home | पाण्याने  कधी  कागद चिकटतो  का ?

पाण्याने  कधी  कागद चिकटतो  का ?

Next
ठळक मुद्दे2. दोन ओले कागद सावकाश ओढून न फाडता वेगळे करता येतात. पण

- राजीव तांबे.

साहित्य : एक वर्तमानपत्रचा कागद, एक वहीचा कागद, एक  छोटा प्लॅस्टिक टब, एक  लिटरपाणी., एक कात्री.

तर करा सुरू :
1. वहीच्या कागदाएव्हढाच वर्तमानपत्रचा कागद कापून घ्या.
2. टबमध ेपाणी ओता.दोन्ही कागद भिजवा.
3. भिजलेले कागद बाहेर काढून एकमेकांवर ठेवून घट्ट दाबा.ते चिकटतील.
4. आता हे कागद जोरात ओढून किंवा घसटून (स्लाइडींग) एकमेकापासून वेगळे करता येत नाहीत, ते फाटतात.

असं का झालं :
1. पदार्थाचे चिकटणो हे दोन प्रकारच्या बलावर अवलंबून असते. पाण्याच्या अणूंमध्ये समकण आकर्षण आणि विषमकण आकर्षण ही दोन्ही बले कार्य करतात. यामुळे कागद एकमेकांना चिकटतात.


2. दोन ओले कागद सावकाश ओढून न फाडता वेगळे करता येतात. पण घसटून वेगळे करता येत नाहीत. 
3. घसटण्याच्या (स्लाइडिंग) क्रियेमध्ये पाण्याच्या रेणूबंधांना तोडावे लागते आणि अधिक बल वापरावे लागते म्हणून कागद फाटतो.
4. कोरडी वाळू घेऊन घर बांधता येत नाही. पण वाळू ओली केली की तिचे कण एकमेकांना चिकटतात आणि मग घरंच काय किल्लाही बांधता येतो.
5. पाणी आणि वाळू यांमधे विषमकण आकर्षण कार्य करते तर पाण्याच्या अणुमधे समकण आकर्षण काम करते आणि वाळू चिकट होते.

 

Web Title: lockdown : DIY - fun activity for kids -paper & water -stay at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.