हाताने नाही , हाताची चित्रं काढा .. 'ही' अशी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 09:34 AM2020-04-11T09:34:58+5:302020-04-11T09:38:35+5:30
आपलाच हात वापरून आपण ठसेकाम करत मस्त चित्र काढू शकतो. अशी पंजाच्या, बोटांच्या सहाय्याने अजून कोणती चित्र काढता येतील बरं?
साहित्य:
पांढरा कागद, पिवळा रंग, हिरवा रंग, बशी, ब्रश, पेन्सिल
कृती
1) एक कागद घ्या.
2) आता एका बशीत पिवळा रंग ओता.
3) त्यात तुमचा उजवा तळ हात बुडवा. संपूर्ण पंजा आणि बोटांना पिवळा रंग लागेल असं बघा.
4) आता पांढ?्या कागदाच्या मधोमध एक मध्यम आकाराचा गोल पेन्सिलने काढा.
5) या गोलाच्या भोवती तुम्हाला पंजाचे ठसे घ्यायचे आहेत.
6) हात ठेवताना बोटं बाहेरच्या बाजूला आणि तळवा पेन्सिलच्या गोलाला लागून अशा पद्धतीने ठेवा आणि त्या पेन्सिलच्या गोलाभोवती एक एक करत मावतील तितके ठसे काढा.
7) प्रत्येक ठसा काढताना हात रंगात भिजवून घ्या.
8) हाताचे पाच तरी ठसे बसतील. त्यापेक्षा कमी बसले तरी हरकत नाही.
9) आता पेन्सिलने या फुलाचा देठ आणि पाने काढा आणि हिरव्या रंगाने रंगवा.
10) मधला रिकामा गोल जो आहे तो चॉकलेटी रंगाने रंगवा.
11) तुमचं सूर्यफूल तयार आहे.
आपलाच हात वापरून आपण ठसेकाम करत मस्त चित्र काढू शकतो. अशी पंजाच्या, बोटांच्या सहाय्याने अजून कोणती चित्र काढता येतील बरं? जरा विचार करा आणि लागा कामाला!