धातूला चव असते का? चाटून पाहा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 07:35 AM2020-04-11T07:35:26+5:302020-04-11T07:40:03+5:30
प्रयोगशाळा असते, आता शाळा नाही; म्हणून घर!
- मराठी विज्ञान परिषद
आपल्या घरात विविध धातुंची भांडी असतात. स्टेनलेस स्टील, पितळ, तांबे, अॅल्युमिनम, सोने, चांदी, लोखंड, कथील, जस्त, इत्यादी. भांडी नसली तरी धातूचे तुकडे, पत्रे, अंगठी, दागदागिने असे काही तरी असेल.
धातुंना चकाकी असते, तन्यता असते, वर्धन क्षमता असते. तशी धातुंना विशिष्ठ चव पण असते का?
एकदा अनुभव घेऊन पाहा :
1. प्रथम धातू स्वच्छ धुवा. कोरडा करा आणि जिभेने चाटा.
2.चव लक्षात घ्या.
3.बघा डोळे बंद केल्यावर धातू ओळखता येतो का?
तांब्याच्या वा चांदीच्या भांड्यात ठेवले की पाणी शुद्ध होते म्हणतात. म्हणजे पाण्याची चव बदलली पाहीजे. आधी पाण्याला चव असते का? मग आपल्याला असे का सांगतात की - पाणी रंगहीन, वासहीन आणि चवहीन आहे. (ते का ते आपण एकदा प्रयोग करून तपासून बघू) आज धातूला चव असते का आणि ती चव पाण्यात उतरते का ते तपासायचे.
1. धातूच्या भांड्यात पाणी ठेवून किंवा धातू काचेच्या ग्लासमधल्या पाण्यात चार तास ठेवून त्या पाण्याला धातूची चव येते का. तपासा.
2. खारट, तुरट, आंबट, तिखट, कडू आणि गोड या मुख्य सहा चवी आहेत.
3. रंगांच्या छटा असतात तशा चवींच्या पण छटा असतात का?