हवा-हवाई!! हवेतल्या हवेत बसायचं आहे ? मग 'असं ' बसा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 07:25 PM2020-04-11T19:25:05+5:302020-04-11T19:28:26+5:30
ज्यांना वजन कमी करायचंय त्यांच्यासाठी तर हा व्यायाम म्हणजे ऊर्जानं आणलेला ‘अल्लाउद्दिन का जादुई चिराग’ आहे!
मला सांगा, तुमच्यापैकी कोणी कोणी उठाबशा काढल्या आहेत?
- आलं ना हसू. घरी नसतील काढल्या, पण अनेकांनी शाळेत नक्कीच उठाबशा काढल्या असतील. शिक्षा म्हणून!
तर या उठाबशा म्हणजेच बैठका. पण मी सांगतेय त्या बैठका वेगळ्या आहेत. आजच्या स्टायलीश भाषेत या व्यायामाला ‘स्क्वॉट्स’ आणि माङया भाषेत ‘हवाहवाई’ म्हणतात! बसून बसून तुमच्यापैकी ज्यांचा ज्यांचा गोल गरगरीत चेंडू झालाय ना, त्यांच्यासाठी आणि ज्यांना वजन कमी करायचंय त्यांच्यासाठी तर हा व्यायाम म्हणजे ऊर्जानं आणलेला ‘अल्लाउद्दिन का जादुई चिराग’ आहे!
काय कराल?
1- नेहेमीप्रमाणो बाणोदारपणो छाती पुढे काढून ताठ उभे राहा.
2- तुम्ही खुर्चीवर बसताना जसे बसता ना, तसे बसा, पण खुर्चीवर नाही, हवेतल्या हवेत! म्हणूनच मी या व्यायामाला ‘हवाहवाई’ म्हणते!
3- हवेत साधारण दोन सेकंद बसा. पायात साधारण चाळीस अंशाचा कोन. दोन्ही पायांवर समान वजन टाकून पुन्हा सरळ उभे राहा.
4- पाठ सरळच पाहिजे. खाली जाताना श्वास घ्या आणि वर येताना श्वास सोडा.
करा असं दहा वेळा. जमायला लागल्यानंतर त्याचे रिपिटेशन्स वाढवा. म्हणजे दहाचे दोन सेट, तीन सेट असं.
यामुळे तुमची पचनशक्ती वाढेल. ब्लड सक्यरुलेशन चांगलं होईल.
- तुमचीच ‘हवाहवाई’ मैत्रीण, - ऊर्जा