मारा दोरीवरच्या उड्या .. साडे माडे तीन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 07:15 AM2020-04-15T07:15:00+5:302020-04-15T07:15:02+5:30
तुम्हाला वाटत असेल, पण हा काही च्याऊम्याऊ व्यायाम नाहीये बरं!!
दोरीवरच्या उडय़ा तुम्ह्ी कधी मारल्या आहेत? आता यात हसायला काय झालं?
तुम्ही दोरीवरच्या उडय़ा कशा मारता, त्या आधी मला सांगा.
हं, मला वाटलंच होतं. तुमच्यातल्या ब:याच जणांना दोरीवरच्या उडय़ा मारताच येत नाहीत, हे माहीत आहे मला.
तुम्ही एका वेळी एकच पाय उचलता आणि प्रत्येक उडीला म्हणता, 10...20....30
म्हणजे एक उडी मारायची आणि दहा मोजायचं. मारायच्या दहाच उडय़ा, त्याही चुकीच्या पद्धतीनं आणि म्हणायचं मी शंभर उडय़ा मारल्या!
अशा तर तुम्ही हजारही उडय़ा माराल!
मी सांगते तुम्हाला दोरीवरच्या उडय़ा कशा मारायच्या ते!
अशा शंभर उडय़ा जरी मारल्या ना एकावेळी, तरी खूप आहे. नंतर हळूहळू त्या वाढवत जायच्या.
आधी चांगला स्किपिंग रोप घ्या. हो, तेच ते. स्किपिंग रोप म्हणजे उडय़ा मारण्यासाठीची दोरी.
1- ही दोरी चांगली पाहिजे. शक्यतो मऊ प्लास्टिकची घ्या.
2- ही दोरी फार लांबही नको आणि फार आखूडही नको. यापैकी काहीही असलं तरी दोरी तुमच्या पायात अडकेल.
3- या दोरीला कंफर्टेबल ग्रिप हवी. म्हणजे ती तुमच्या हातातून सटकणार नाही. नुसतीच दोरी घेतली, तर ती वजनानं फार हलकी होते आणि जास्त उडय़ा मारता येत नाहीत.
4- आपलं शरीर आणि दोरी यांच्यामध्ये साधारण 45 अंशाचा कोन झाला पाहिजे.
5- लक्षात ठेवा, दोरीवरच्या उडय़ा मारताना हात नाही, आपल्याला फक्त आपलं मनगट फिरवायचं आहे.
6- खूप उंच उडी मारायची नाही आणि गुडघेही वाकवायचे नाहीत. नाहीतर तुमचे गुडघे दुखतील.
हा च्याऊमाऊ व्यायाम नाही. अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडूही हा व्यायाम करतात. यामुळे तुमच्या अप्पर आणि लोअर बॉडीचे मसल्स मस्त तयार होतील. पोट:या एकदम भारी होतील. तुमचा हार्ट रेट सुधारेल. चपळता वाढेल, शरीराचा बॅलन्स आणि समन्वयही चांगला होईल. तुमच्यापैकी ज्यांचा ‘चेंडू’ झालेला असेल, त्यांना तर हा व्यायाम मस्ट. पण लक्षात ठेवा, योग्य त:हेनेच हा व्यायाम करायला हवा.
- तुमचीच ‘उडीबाज’ मैत्रीण,