तो आज  कितने  क्रन्चेस  मारे ?- बोलो  बोलो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 02:08 PM2020-04-11T14:08:24+5:302020-04-11T14:12:08+5:30

क्रन्चेस - थोड्डं अवघड आहे, पण प्रयत्न केलात तर जमेल नक्की!

lockdown-DIY - kids exercise stay at home- crunches. | तो आज  कितने  क्रन्चेस  मारे ?- बोलो  बोलो 

तो आज  कितने  क्रन्चेस  मारे ?- बोलो  बोलो 

Next
ठळक मुद्देहळूहळू, थोडंथोडं करा, पण परफेक्ट करा.

काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला ‘सिक्स पॅक आणि एट पॅक’चा एक व्यायाम सांगितला होता, आणि मी तुम्हाला हेही सांगितलं होतं, कोणताही एकच एक व्यायामप्रकार फारसा उपयोगी ठरत नाही. उसमें थोडी व्हरायटी भी चाहिए और थोडी स्टाइल भी.
आज मी तुम्हाला आधीच्यापेक्षा थोडा अवघड व्यायाम शिकवणार आहे. पोटाची ताकद वाढवण्याचा. 
या व्यायामाचं नाव आहे ‘क्रन्चेस’.
 हा व्यायाम जपून करायचा. जास्त घाई करायची नाही आणि अति तर बिलकुल करायचं नाही. यावरून कोणाशी पैज वगैरे तर फार दूरची गोष्ट.


कसा कराल हा व्यायाम?
1- झोपा पाठीवर. 
2- गुडघे वाकवा आणि पाय जमिनीला समांतर ठेवा.
3- आपले हात डोक्याच्या मागे न्या. हातांचे अंगठे आपल्या कानांजवळ आले पाहिजेत.
4- हनुवटी किंचित पुढे झुकलेली.
5- आता पोटाची ताकद लावून आपलं शरीर हळूहळू वर उचला. गुडघ्यांच्याजवळ. नंतर हळूहळू परत खाली या. पाठ जमिनीला हलकेच टेकवा आणि लगेच परत उचला.
6- असं पाच-सात वेळा करा.
7- हा व्यायाम जर तुम्हाला आणखी चॅलेंजिंग करायचा असेल, तर आपलं शरीर वर घेताना त्याला पिळ द्या.
पण मागे सांगितलं होतं, तेच परत एकदा. जेवढं जमेल तेवढंच करा. उगाच शरीराची ओढाताण करू नका.
त्यामुळे हळूहळू, थोडंथोडं करा, पण परफेक्ट करा. आठवडय़ातून एकदा किंवा दोनदा तुम्हाला हा व्यायाम करता येईल. 
पोटासाठी हा व्यायाम एकदम भारी आहे. पोटाच्या जवळपास सगळ्या मसल्सचा व्यायाम यातून होतो. 
 

Web Title: lockdown-DIY - kids exercise stay at home- crunches.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.