ही पहा जादूची बादली ! पाण्याने भरून फिरवली, तरी एक थेंब सांडणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 07:50 AM2020-04-25T07:50:00+5:302020-04-25T07:50:02+5:30

दुपारी सगळे झोपल्यावर घरी बसून करायचे उद्योग

lockdown : DIY - kids fun activity- magic bucket. | ही पहा जादूची बादली ! पाण्याने भरून फिरवली, तरी एक थेंब सांडणार नाही!

ही पहा जादूची बादली ! पाण्याने भरून फिरवली, तरी एक थेंब सांडणार नाही!

Next
ठळक मुद्दे बादलीमधे अर्धे पाणी भरा. वेगात फिरवा गरागरा. एक थेंब ही पाणी सांडणार नाही. का...?

- राजीव तांबे

साहित्य :
01 छोटी बादली. 01 मीटर जाड दोरी. 05 लिटर पाणी.
50 कागदाचे बोळे.

तर करा सुरू :
1. कागदाचे बोळे बादलीत ठेवा.
2. प्रथम हातात बादलीची कडी पकडून, हात ताठ ठेवून बादलीला जोरात आडवे
झोके द्या. बादलीला चांगला वेग आला की ती उभ्या वतुर्ळाकार दिशेने गरागरा
फिरवा. वरच्या बिंदूपाशी बादली पूर्ण उलटी झालेली असेल.
3. यावेळी गोल फिरण्याचा वेग जास्ती असेल तर एकही बोळा खाली पडणार
नाही.
4. बादली किती वेगात फिरवली असता बोळे पडत नाहीत याचा अंदाज आता
तुम्हाला आला असेल.
5. आता बादलीच्या कडीला मध्यभागी दोरी घट्ट बांधा. हातात दोरी घट्ट धरुन
बादली गरागरा फिरवा. दोरी बांधलेली असल्याने बादली वेगात फिरवणो सोपे होते.
6. आता बादलीमधे अर्धे पाणी भरा. आणि वेगात फिरवा गरागरा. एक थेंब ही
पाणी सांडणार नाही.

असं का झालं :

बादली जेव्हा वर्तुळाच्या वरील बिंदूपाशी उलटी असते तेव्हा गुरुत्वाकर्षण
पृथ्वीच्या दिशेने आणि केंद्रगामी बल (सेंट्रिफ्युगल फोर्स) विरुध्द दिशेने त्यावर
कार्य करतात. एका विशीष्ठ वेगात बादली फिरत असताना केंद्रगामी बल
गुरुत्वाकर्षणाइतके होते आणि वस्तू स्थिर राहते. त्याहून जास्त वेग वाढला तर
वस्तू पडत नाही.

 

Web Title: lockdown : DIY - kids fun activity- magic bucket.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.