challenge : आपल्या हातांवर आपली बॉडी उचलायची दाखवा उचलून !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 01:21 PM2020-04-11T13:21:11+5:302020-04-11T13:24:04+5:30
हा एक ओव्हरऑल बॉडी वर्कआऊट समजला जातो. कारण तुमच्या शरीराच्या ब:याच अवयवांना यामुळे व्यायाम मिळतो.
आपण आता थोडय़ा अवघड व्यायामप्रकारांकडे वळलो आहोत. या व्यायामांमुळे आपला स्टॅमिना वाढेल, लवचिकता वाढेल आणि इतरही अनेक गोष्टींसाठी त्यांचा उपयोग होईल. पण आपण असे टफच व्यायाम प्रत्येक वेळी करणार असं काही नाही. मधेमधे मी तुम्हाला काही सोपेही व्यायाम शिकवीन. पण ते सोपे आहेत, म्हणजे त्यांचा उपयोगही कमी आहे, असं मात्र मुळीच समजू नका.
व्यायामाचा सराव असणं आणि तो सातत्यानं, गॅप न पडू देता करणं जास्त महत्त्वाचं.
अभ्यास रोज थोडा का होईना करायचाच आणि बाकी थोडा वेळ मग टाइम्पास केला तरी चालतो, तसंच व्यायामही रोज करायला हवा. फक्त थोडे दिवस अभ्यास करून कदाचित तुम्हाला चांगले मार्क्स मिळतीलही, पण थोडय़ाच दिवसांत कोणीच ‘गामा पहिलवान’ होत नाही. त्यासाठी सातत्य हवं.
आजचा व्यायामप्रकार आहे पुश-अप्स.
म्हणजे काय थोडक्यात, तर आपल्या हातांवर आपली बॉडी उचलायची.
कसा कराल हा व्यायाम?
1- आधी जमिनीवर, पोटावर झोपा.
2- आता आपल्या दोन्ही तळव्यांचा आधार घेऊन त्यावर आपली बॉडी उचला.
3- पाय ताठ ठेवा. शक्यतो गुडघ्यात वाकू देऊ नका.
4- आपल्या शरीराचं सर्व वजन छातीवर आलं पाहिजे.
5- हात सरळ ठेवा. आता आपल्या दंडांचा आधार घेऊन हळूहळू खाली जायचं. आपल्या कोपरांमधलं अंतर 9क् अंशांचं असावं.
6- हात उगीचंच वेडेवाकडे, तिरपेतारपे करायचे नाहीत. तसे होत असतील तर लगेच थांबायचं.
7- आधी पाच वेळा करा. जमायला लागल्यानंतर रिपिटेशन्स वाढवता येतील, पण सहजपणो जमत असेल, तरच.
हा एक ओव्हरऑल बॉडी वर्कआऊट समजला जातो. कारण तुमच्या शरीराच्या ब:याच अवयवांना यामुळे व्यायाम मिळतो. तरीही हा मुख्यत्वे छातीचा व्यायाम समजला जातो. शिवाय यामुळे तुमच्या शरीराला आकार येतो आणि रक्ताभिसरणही चांगलं होतं. करा हा व्यायाम आणि द्या इतरांना खुन्नस.
तुमचीच ‘खुन्नसबाज’ मैत्रीण,
- ऊर्जा