आपले डोळे एकमेकांना भेटले तर ते कसं दिसेल ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 10:12 PM2020-04-10T22:12:52+5:302020-04-10T22:22:08+5:30

प्रयोगशाळा असते, आता शाळा नाही; म्हणून घर!

lockdown - DIY - know your eyes, game for kids. | आपले डोळे एकमेकांना भेटले तर ते कसं दिसेल ?

आपले डोळे एकमेकांना भेटले तर ते कसं दिसेल ?

googlenewsNext
ठळक मुद्देआपल्या घरात असे कोणते साधन आहे की ज्यामुळे आपले डोळे एकमेकांना पाहू शकतील? 

- मराठी विज्ञान परिषद


दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी अशी एक म्हण मराठीत आहे. 
आपण आपल्या डोळ्यांची भेट घडवून आणू शकतो का? 
आपल्या घरात असे कोणते साधन आहे की ज्यामुळे आपले डोळे एकमेकांना पाहू शकतील? 
त्या साधनाचा आणि पट्टीचा वापर करून आपल्या दोन डोळ्यांमध्ये किती अंतर आहे ते मोजायचं. 
- जवळ बघताना किती अंतर आहे?
 - दूर बघताना किती अंतर आहे? (हे आपलं आपल्याला मोजता येईल? दुसऱ्याच्या डोळ्यातलं मोजता येईल? )
मोजून पहा. 


काय करायचं?
मोजून पहा. 
1- दोन्ही डोळ्याचा मध्य ते मध्य अंतर किती?
2 - उजव्या डोळ्याचे डावे टोक ते डाव्या डोळ्याचे उजवे टोक यात किती अंतर आहे?
3 - डोळ्याच्या गोलाचा व्यास किती आहे?
4- दोन भुवयांच्या मध्ये अंतर किती आहे?
अशा अनेक जणांच्या डोळ्यांच्या मापनातून पुढील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळवता येतील :
- प्रत्येकाचे दोन डोळे तितकेच शेजारी असतात का? 
- डोळ्यांमधला नाकाचा भाग सर्वांचा सारखाच असतो का?
- वय वाढतं तसा डोळ्याचा आकार बदलतो का?
- भुवयांच्या ठेवणीचा आणि माणसाच्या स्वभावाचा काही संबंध आहे का?
विचार करून पाहा!

Web Title: lockdown - DIY - know your eyes, game for kids.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.