कशी कराल शरीराची पवनचक्की?-हा  व्यायाम करून तर पाहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 05:00 AM2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:00:02+5:30

खरोखरच्या विंडमिल्सपासून ऊर्जा मिळवतात, हा व्यायाम तुम्हालाही ऊर्जा मिळवून देईल.

lockdown = DIY - learn exercise at home, windmill | कशी कराल शरीराची पवनचक्की?-हा  व्यायाम करून तर पाहा !

कशी कराल शरीराची पवनचक्की?-हा  व्यायाम करून तर पाहा !

Next
ठळक मुद्देहा व्यायाम तुम्ही शाळेत पीटीच्या तासाला केला असेल, पण आता पुन्हा करून पाहा. फार मजा येईल. 

या उन्हाळ्यानी काय घामटं काढलं असेल ना तुमचं?. त्यात घराबाहेर निघायचं नाही, शाळेत जायचं नाही, खेळायला जायचं नाही, ग्राऊंडवर जायचं नाही, मोकळा वारा खायचा नाही. सगळा नन्नाचाच पाढा!
तुम्हाला किती बोअर होत असेल, हे मला माहीत आहे, पण याच काळात तर आपली क्रिएटिव्हिटी पणाला लावायची असते. वेगवेगळे प्रयोग करून पाहायचे असतात. जे जे आपल्याला नवीन आहे, माहीत नाही, किंवा ज्याची फक्त तोंडओळख आहे, अशा गोष्टी करून पाहायच्या असतात.
आपला व्यायाम जर आणखी इंटरेस्टिंग करायचा असेल, तर त्यासाठीही अशाच नवनवीन गोष्टी जर आपण करुन पाहिल्या, तर आपल्याला नव्या गोष्टी माहीत तर होतातच, पण आपल्या शरीरालाही त्या व्यायामाची सवय होते. कारण प्रत्येक व्यायाम वेगळा असतो आणि त्यातून किमान काही प्रमाणात का होईना, आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना वेगवेगळा व्यायाम मिळतो. 
आज आपण असाच एक हटके व्यायाम करणार आहोत. या व्यायामाचं नावही तसंच हटके आहे- ‘विंडमिल’! 
मराठीत याला म्हणायचं पवनचक्की.
खास उन्हाळ्यासाठी मी हा व्यायाम तुमच्यासाठी घेऊन आले आहे. खरोखरच्या विंडमिल्सपासून ऊर्जा मिळवतात, हा व्यायाम तुम्हालाही ऊर्जा मिळवून देईल.
कशी कराल शरीराची पवनचक्की?


1- अगोदर ताठ उभे राहा.
2- आपल्या दोन पायात आपल्या खांद्यांइतकं किंवा त्यापेक्षा थोडं अधिक अंतर घ्या.
4- आता कंबरेतून खाली वाका आणि आपल्या शरीराला कंबरेतून थोडा झोका देत आपल्या उजव्या हाताची बोटं डाव्या पायाच्या लावा.
5- आता तसंच उलटं, म्हणजे डाव्या हाताची बोटं उजव्या पायाच्या बोटांना लावा.
6- पण हे करीत असताना उंभ राहू नका आणि आपले पाय गुडघ्यातून वाकूही देऊ नका. दोन्ही बाजूंनी किमान दहा दहा वेळेस आपलं शरीर या प्रकारे फिरवा.
आपल्या शरीराचा हा जो पंखा होईल ना, तीच पवनचक्की!
यामुळे काय होईल?
1- तुमच्या कंबरेचा छान व्यायाम होईल.
2- पोटालाही व्यायाम मिळेल.
3- तुमची लवचिकता वाढेल.
4- तुमच्यातला उत्साह वाढेल.
हा व्यायाम तुम्ही शाळेत पीटीच्या तासाला केला असेल, पण आता पुन्हा करून पाहा. फार मजा येईल. 
चला, आता हवा येऊ द्या.
- तुमचीच ‘पवनचक्की’, ऊर्जा

Web Title: lockdown = DIY - learn exercise at home, windmill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.