लाल रंग काळ्या रंगात लिहा ! -क्या कन्फ्यूजन है ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 07:55 AM2020-05-02T07:55:00+5:302020-05-02T07:55:01+5:30
झाला ना गोंधळ? - तीच तर मजा आहे या प्रयोगाची!
Next
ठळक मुद्देआपला मेंदू वाचनाची क्रिया रंगाऐवजी शब्दांशी जोडतो
- मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
साहित्य :
कोरा कागद, पेन्सिल, रंगीत खडू किंवा ब्रश - रंग
कृती :
1. एक कोरा कागद घ्या.
2. त्यावर पेन्सिलिने मोठ्या पुसट अक्षरात तुम्हाला माहिती असलेल्या रंगांची नावे लिहा.
3. ती नावे कोणताही दुसरा रंग वापरून ठळक करा. उदा. लाल हा शब्द काळ्या रंगाने रंगवा.
4. सर्व अक्षरे वेगळ्या रंगांनी रंगवून झाल्यावर.
5. शब्द न वाचता रंग मोठ्याने वाचून दाखवायला इतरांना सांगा.
असे का होते?
1. आपला मेंदू वाचनाची क्रिया रंगाऐवजी शब्दांशी जोडतो असे आढळते.