हे  ऐका , ग्लास गाणं म्हणतोय... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 02:34 PM2020-04-27T14:34:10+5:302020-04-27T14:35:35+5:30

दुपारी सगळे झोपल्यावर घरी बसून करायचे उद्योग

lockdown : DIY - Listen to this, Glass is singing, kids fun activity | हे  ऐका , ग्लास गाणं म्हणतोय... 

हे  ऐका , ग्लास गाणं म्हणतोय... 

googlenewsNext
ठळक मुद्देगाना- बजाना

- राजीव तांबे

साहित्य : जाड कागदाचा किंवा जाड प्लॅस्टीकचा ग्लास. सेफ्टि पिन. जाड दोरा (सुमारे 40 सें.मी. लांब)

तर करा सुरू :
1. सेफ्टि पिनच्या मदतीने ग्लासच्या तळाला मध्यभागी एक बारीक भोक पाडा.
2. या भोकातून दोरा ओवून घ्या. या दोर्?याला ग्लासच्या आतल्या बाजूने मोठी गाठ मारा. आता ग्लास मधून दोरा बाहेर लटकत राहील.
3. आता एका हातात ग्लास गच्चं धरुन, दुसर्?या हाताने दोरा ताठ ताणलेलाठेवून त्यावरून अंगठ्याचे नख जोरात खाली-वर फिरवा.
4. ग्लास गाणं म्हणू लागेल. ग्लासाचे गाणो बदलण्यासाठी सोपी आयडिया : एकाचवेळी वेगवगेळ्या जाडीचे दोन किंवा तीन दोरे ओवा आणि क्लासिकल गाणं ऐका.

असं का होतं :
1. नख दोर्?यावर घासल्याने जी कंपनं निर्माण होतात ती दोर्?याच्या दुसर्?या टोकाला म्हणजे ग्लासात पोहोचतात. त्यामुळे ग्लासातील हवेची पोकळी कंप पावते.


2. मग त्या ध्वनीलहरी ग्लासाच्या आतल्या भिंतीवर पुन:पुन्हा आपटतात, परावर्तीत होतात आणि सर्व लहरी एकत्र होऊन मग आवाज मोठा होतो. 
3. या संकल्पनेला  ‘अनुनाद’ असे म्हणातात. सतार, तंबोरा, एकतारी अशाप्रकारच्या संगीत वाद्यांमधे
पोकळी वापरून निर्माण झालेल्या कंपनांचे वर्धन करतात.


 

Web Title: lockdown : DIY - Listen to this, Glass is singing, kids fun activity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.