बिस्कीट चीज सॅन्डविच खाल्लंय कधी ? नाही ? -मग  करा मस्त आणि फस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 01:45 PM2020-04-13T13:45:18+5:302020-04-13T13:47:20+5:30

दुपारचा खाऊ. चला, आज तुमचा तुम्हीच बनवून घ्या पटापट !

lockdown - DIY - make cheese biscuits sandwitch at home! stay at home. | बिस्कीट चीज सॅन्डविच खाल्लंय कधी ? नाही ? -मग  करा मस्त आणि फस्त !

बिस्कीट चीज सॅन्डविच खाल्लंय कधी ? नाही ? -मग  करा मस्त आणि फस्त !

Next
ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग

आज आपण दुपारी भूक भूक झाल्यावर करायच्या मस्त रेसिपीज शिकणार आहोत. चार वाजता भूक लागते आणि मग आपण आईचं डोकं खातो. त्यापेक्षा आता स्वत:च्या हातानी बनवलेला खाऊ खाऊया. 
लॉक डाऊन मुळे आईबाबांनी घरात भरपूर बिस्किटं आणून ठेवली असतील. चीज, टोमॅटो, काकडी, मिरपूड असे पदार्थ घरात असतातच! चला तर लागा कामाला. 
साहित्य: 
खाऱ्या  चवीची कुठलीही बिस्किटं, चीज स्लाईस किंवा किसलेलं चीज, टोमॅटोचे गोल काप, काकडीचे गोल काप, मीठ, मिरपूड, घरात असल्यास कॉर्नचे दाणो 
कृती: 
1) एका रिकाम्या प्लेटमध्ये एक खारं बिस्कीट ठेवा. 
2) त्यावर त्या बिस्किटाच्या आकाराचा कापलेला चीज स्लाइसचा तुकडा ठेवा.
3) समजा चीज किसलेलं असेल तर थोडा किस पसरावा. 
4) त्यावर मिरपूड भुरभुरवा. 
5) त्यावर टोमॅटोची फोड ठेवा. त्यावर किंचित मीठ टाका. 
6) आता त्यावर काकडी आणि वर कॉर्नचे एकदोन दाणो. 

 


7) तुमचा मधल्या वेळचा टेस्टी खाऊ तयार आहे. 
8) अशा पद्धतीने बिस्किटांवर वेगवेगळे प्रकार रचून मस्त बाइट्स बनवता येऊ शकतात. 
9) आता गोड बिस्किटांवर काय काय चांगलं लागेल विचार करा बरं? आणि नक्की बनवून बघा. 


 

Web Title: lockdown - DIY - make cheese biscuits sandwitch at home! stay at home.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.