टी-शर्ट्सचं मस्त  डिझायनर पांघरुण बनवायचं का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 07:30 AM2020-05-19T07:30:00+5:302020-05-19T07:30:11+5:30

आज घरात बसल्या बसल्या करता येईल, अशी मस्त धम्माल!

lockdown - DIY - make designer T shirt blanket | टी-शर्ट्सचं मस्त  डिझायनर पांघरुण बनवायचं का ?

टी-शर्ट्सचं मस्त  डिझायनर पांघरुण बनवायचं का ?

googlenewsNext
ठळक मुद्दे... तर तुमचं डिझायनर पांघरूण तय्यार!

तुमच्याकडे जुने टी शर्ट्स आहेत? जुने शर्ट्र्स? फ्रॉक्स? स्कर्ट्स? टॉप्स? शॉर्ट्स? पण जुने म्हणजे किती जुने? तर इतर कोणाला देण्याइतपत पण चांगले नाहीत असे. कारण काही वेळा असं होतं, की आपल्याला तो टीशर्ट जुना वाटतो पण मावसभावाला तो देता येतो. तर इतपत जे कपडे चांगले असतील ते घेऊ नका. किंवा काही कपडे आपण इतके प्रेमाने वापरतो की शेवटी आई आपल्या नकळत ते कपाटातून काढून घेते आणि डायरेक्ट कपाट पुसायलाच वापरते. तर इतके जुनाट झालेले कपडे पण नकोत. म्हणजे आपल्याला कसे जुने कपडे पाहिजेत माहितीये का? तर जे आपण आपल्या घरी घालू शकतो पण इतर कोणाकडे घालून जात नाही. किंवा असे कपडे जे आपण होळी / रंगपंचमीला बिनधास्त वापरले असते.
तर असे जेवढे कपडे सापडतील तेवढे काढा आणि कापा!
म्हणजे वाकडे तिकडे नका कापू! एकसारखे चौकोनी चौकोनी कापा. आता हे चौकोन मस्त रंगीबेरंगी दिसतील असे मांडा. ते असेच एकमेकांना शिवून आपल्याला त्यांची पॅचवर्कची क्विल्ट / गोधडी बनवायची आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारचं कापड असेल. जीन्स, सिल्क, कॉटन, सिंथेटिक.. ते आपण कसं वापरणार याचा विचार करा. म्हणजे जीन्स फक्त बॉर्डरला वापरायची का? म्हणजे क्विल्ट भक्कम होईल. किंवा सिल्कला खालून जोड द्यावा लागेल का? अशा सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि शिवून टाका ते तुकडे एकमेकांना.


या क्विल्टस जर तुम्ही छोट्या बनवल्यात, तर खुर्चीवर बसायला वापरता येतील, थोड्या मोठ्या केल्यात तर टेबल क्लॉथ आणि त्याहून मोठ्या केल्यात तर चक्क रंगीबेरंगी चादर म्हणून वापरता येतील. आणि सगळ्यात भारी  म्हणजे या क्विल्टला जर आतल्या बाजूने मऊ सुती साडीचा किंवा जुन्या चादरीचा जोड लावलात तर तुमचं डिझायनर पांघरूण तय्यार!


 

Web Title: lockdown - DIY - make designer T shirt blanket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.