कानातले घरभर फिरतात ? मग त्यांच्यासाठी बनवा मस्त होल्डर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 05:11 PM2020-05-21T17:11:04+5:302020-05-21T17:11:47+5:30

हे मुलींच्या उपयोगाचं आहे, पण मुलगेही बनवू शकतातच की!

lockdown - DIY - make ear rings holder | कानातले घरभर फिरतात ? मग त्यांच्यासाठी बनवा मस्त होल्डर 

कानातले घरभर फिरतात ? मग त्यांच्यासाठी बनवा मस्त होल्डर 

Next
ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग


निरनिराळ्या प्रकारचे खूप सारे कानातले मुलींकडे असतात. लटकन, टॉप्स आणि काय काय. एकाच डबीत  सगळे ठेवले तर आयत्या वेळी एकतर सापडत नाहीत किंवा एकमेकांत जाम गुंतून बसतात. आता तुम्ही बसल्या बसल्या कानातल्यांसाठी मस्त स्टॅन्ड बनवू शकता. 
साहित्य: 
कार्ड बोर्ड किंवा जाड पुठ्ठा, पेन्सिल, पट्टी, कर्कटक , रंग 
कृती:
1) तुमच्याकडे किती कानातल्यांचे जोड आहेत ते मोजा. 
2) त्या अनुषंगाने कार्डशीट किंवा पुठ्ठ्याचा तुकडा घ्या. 
3) एकावेळी ए फोर आकाराच्या कागदापेक्षा मोठा नको, किंवा त्याहीपेक्षा लहान चालू शकेल. 
4) आता एक सेंटिमीटरवर उभ्या आणि आडव्या रेषा मारून घ्या. 
5) प्रत्येक एक सेंटिमीटरवर जिथे उभ्या आणि आडव्या रेषा एकमेकांना छेदतात तिथे पेन्सिलने डार्क टिम्ब काढा.
6) आणि कर्कटकने त्यावर छिद्र पाडा. हे छिद्र कानातल्याची काडी जाईल इतपत असायला हवं. 


7) आता कार्डशीट/पुठ्ठा तुमचा हवा त्या पद्धतीने, डिझाईनने रंगवा. 
8) त्याला एकतर स्टॅन्ड करा किंवा पुठ्ठ्याच्या वरच्या बाजूला दोन्ही टोकांना मोठी छिद्र पडून त्यातून सुतळी ओवून हे टॉप्स होल्डर तुम्ही लटकवू शकता. 
9) किंवा या पुठ्ठ्याच्या मागच्या बाजूने चारही बाजूंनी डबल टेप लावा. डबल टेपचे दोन स्तर लावा आणि मग हा होल्डर तुमच्या कपाटाच्या आतल्या बाजूने चिकटवून टाका. 
10) रंग वाळल्यावर प्रत्येक दोन शेजारच्या छोट्या छिद्रामध्ये तुमची कानातली लटकवा. 
 

Web Title: lockdown - DIY - make ear rings holder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.