धडपडलात तर ही एक गोष्ट आहे का तुमच्या घरात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 04:39 PM2020-05-27T16:39:54+5:302020-05-27T16:47:30+5:30

फर्स्ट एड किट

lockdown - DIY - make first aid kit | धडपडलात तर ही एक गोष्ट आहे का तुमच्या घरात?

धडपडलात तर ही एक गोष्ट आहे का तुमच्या घरात?

Next
ठळक मुद्देकधीही बघा, तुम्हाला कायम कुठेतरी खरचटलेलं असतं

तुमच्या वयात जगातल्या सगळ्या मुलांमध्ये सगळ्यात कॉमन गोष्ट कुठली असते माहितीये का? म्हणजे शाळा, अभ्यास, आईवडिलांची बोलणी खाणं वगैरे गोष्टींबद्दल नाही विचारलं. असा कुठला स्वभावधर्म किंवा कॅरॅक्टरिस्टिक असतो जो संपूर्ण जगातल्या तुमच्या वयाच्या मुलांमध्ये असतोच असतो?
तर धडपडणे !
खरंच,  तुम्ही कधीही तुमचे मित्रमैत्रिणी बघा. कायम कुठेतरी खरचटलेलं असतं, गुढगे फुटलेले असतात, काटे टोचलेले असतात, चटके बसलेले असतात, ठेचा लागलेल्या असतात! दर दोन तीन दिवसांनी काही ना काहीतरी आयडिया करून कुठेतरी काहीतरी लागलेलं असतंच. पण त्याला काही इलाज नाही. वेंधळेपणा करणो, सरळ चालतांना रस्त्यातला दगड न दिसून त्याला अडखळणो हे सगळे तुमच्या वयाचे कारनामे आहेत. तुम्ही जसे मोठे व्हाल तसं हे धडपडणं कमी होत जातं. पण ते नंतर!! आत्ता त्याचं काय करायचं?
तर आत्ता आपण धडपडलो तर निदान त्यासाठी लागणारं फस्र्ट एड किट घरात बनवून ठेवायचं. त्यात आपल्याला काय काय लागू शकेल याचा विचार करायचा. म्हणजे स्वच्छ कापूस, आयोडीन, बँडेड, कॉटन बँडेज, सोफ्रामायसिन सारखं एखादं मलम, बरनॉल सारखं भाजण्यावरचं मलम, काटा गेला तर तो काढण्यासाठी मोठी सुई, हात किंवा पाय मुरगळला तर तो बांधून ठेवण्यासाठी क्रेप बँडेज, मग ते गरम ठेवण्यासाठी आयोडेक्स किंवा नायझरसारखं मलम, शिकायला गरम पाण्याची पिशवी इत्यादी.


जितका विचार कराल तितक्या वस्तू तुम्हाला आठवतील. यातल्या अनेक वस्तू घरात असतील, काही मेडिकल स्टोअरमधून विकत आणायला लागतील. पण हे सगळं सामान एकत्र करून, एका मोठ्या खोक्यात ठेऊन त्यावर मोठ्या अक्षरात  ‘मेडिकल किट’ असं लिहून घरात प्रत्येकाला दाखवून ठेऊन द्या. ते कधी नाही लागलं तर चांगलंच आहे, पण जेव्हा लागेल तेव्हा हे सगळं सामान एका जागी सापडेल आणि तुमचं कौतुक होईल हे नक्की!

Web Title: lockdown - DIY - make first aid kit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.