कागदाचा बोळा , बोळ्याचं ग्रीटिंग, कधी केलंय का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 07:30 AM2020-04-29T07:30:00+5:302020-04-29T07:30:02+5:30

कागद चुरडून बोळा करा. ही पण एक भारी कला आहे. कशी? .. वाचा, आणि करून पाहा!

lockdown - DIY - make paper balls & geeting- kids fun activity | कागदाचा बोळा , बोळ्याचं ग्रीटिंग, कधी केलंय का ?

कागदाचा बोळा , बोळ्याचं ग्रीटिंग, कधी केलंय का ?

Next
ठळक मुद्दे) हा बोळा शेवटी एकदा उघडा पण सरळ करू नका. तसाच कोरडा होऊ देत. 

- राजीव  तांबे 


आईबाबा काहीतरी काम करत असतात, त्याच्या मनाप्रमाणो काही लिहिलं गेलं नाही कि त्या कागदाचा बोळा करून ते कच?्यात टाकतात बरोबर! 
आता आपण असेच बोळे बनवून त्यापासून मस्त डिझाइन्स तयार करूया. 
साहित्य,: 
कागद, ओले रंग, कात्री, ब्रश 
कृती: 
1) एका ए-फोर साईज कागदाचे चार भाग करून घ्या. 
2) त्याचा चक्क बोळा करा. 
3) मग हा बोळा सगळीकडून तुम्हाला आवडेल त्या रंगाने रंगवून घ्या. 
4) मग उलगडा. आणि परत त्याचा बोळा करा. 
5) यावेळी  रंगाने रंगवा. 


6) हळूच परत हा बोळा उघडा. उलट करा. परत बोळा करा. हे करताना कागद फाटणार नाही याची काळजी घ्या. 
7) असं अनेकदा करा. प्रत्येकवेळी बोळा केल्यानंतर वेगळ्या रंगाने रंगवा. 
8) तुम्हाला हवे तेवढे रंग लावून झाले कि थांबा. 
9) हा बोळा शेवटी एकदा उघडा पण सरळ करू नका. तसाच कोरडा होऊ देत. 
10) बोळा केलेला कागद पूर्ण कोरडा झाला की नीट सरळ करा. हा कागद तुम्ही निरनिरळ्या गोष्टींसाठी वापरू शकता. अगदी आईबाबांना, जवळच्या मित्रमैत्रिणींना यावर पत्र लिहू शकता किंवा छानसं ग्रीटिंग करू शकता.  


 

Web Title: lockdown - DIY - make paper balls & geeting- kids fun activity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.