बनवा कागदांचे दगड , दगडांचे राक्षस आणि करा फाईट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 04:35 PM2020-04-08T16:35:11+5:302020-04-08T16:39:39+5:30
खरे दगड नसतील तर नो टेन्शन, आपण कागदांच्या बोळ्यांचे दगड बनवू!
तुम्ही आता जरी घराबाहेर पडू शकत नसाल तरीही तुम्ही जेव्हा केव्हा बाहेर फिरायला आईबाबांच्या बरोबर जाता तिकडून तुम्ही दगड नक्कीच गोळा करून आणत असाल. किंवा तुमच्या घराला अंगण असेल आणि तिथे जायला आईबाबांनी परवानगी दिली तर अंगणातूनही तुम्ही दगड गोळा करून आणू शकता. आणि तेही शक्य नसेल तर कागदाचे दगड बनवायलाही आपण शिकूया. तर हे दगड घेऊन त्यांचे राक्षस बनवून तुम्ही एखादा काल्पनिक खेळ तयार करू शकता.
साहित्य : गोळा केलेले दगड, कागद, डिंक, रंग, स्केच-
पेन्स, रिबिन्स, किंवा इतर टाकाऊ सामान.
कृती :
कागदाचे दगड : रद्दीचा पेपर चोळामोळा करून गोल करा. त्यावर चारही बाजूने डिंक फासा. आणि त्या डिकांवर परत कागदाचे तुकडे चिकटवून ओबड धोबड दगड तयार करा. हे दगड वाळल्यावर रंगवायला घेता येतील.
1) तुमच्या जवळ असलेले दगड, कागदाचे दगड घ्या.
2) प्रत्येक दगड एका किंवा एकापेक्षा अधिक रंगात रंगवा.
3) रंगवताना शक्यतो भडक रंग वापरा.
4) बेस कलर वाळला की प्रत्येक दगडावर आणखीन काहीतरी काढा.
5) उदा. एखाद्या दगडावर रंगीत ठिपके काढा.
6) एखाद्या दगडावर एका बघून ओबड धोबड रेघोटय़ा मारा.
7) एखाद्या डागावर वरून किंवा खालून आकार काढा आणि मधला भाग मोकळा सोडा.