घरच्या घरी तुमच्या घराचा नकाशा बनवला तर ? -मज्जा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 12:21 PM2020-04-17T12:21:30+5:302020-04-17T12:22:30+5:30

आपलं घर छप्पर काढून टाकून आकाशातून बघितलं तर कसं दिसेल, असा विचार करा आणि लागा कामाला!

lockdown - DIY - make your home map. stay at home- kids acitivity. | घरच्या घरी तुमच्या घराचा नकाशा बनवला तर ? -मज्जा !

घरच्या घरी तुमच्या घराचा नकाशा बनवला तर ? -मज्जा !

Next
ठळक मुद्देपट्टी पेन्सिल घ्यायची, आणि डायरेक्ट नकाशा काढायला सुरुवात करायची.

भूगोलात नकाशे असतात ? देशाचा, जगाचा, महाराष्ट्राचा नकाशा तुम्ही बघितलाय का? हे नकाशे कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात बरं? तर राजकीय नकाशा असतो. आपण सामान्यपणो ज्याला नकाशा म्हणतो तो राजकीय सीमा दाखवणारा नकाशा असतो. त्याशिवाय जमिनीचा उंचसखलपणा दाखवणारे नकाशे असतात. 
जंगल आणि नागरी वस्ती दाखवणारे, पाण्याचे स्नेत दाखवणारे, डोंगरद?्या दाखवणारे असे विविध प्रकारचे नकाशे असतात. आणि हे सगळेच्या सगळे नकाशे आपण भूगोलाच्या अभ्यासात  ‘हॅट बोअर आयटम’ असं म्हणून बाजूला ठेऊन देतो. यात अपवाद फक्त दोन प्रकारच्या मुलांचाङ्घ एकतर अभ्यासू गॅंग आणि दुसरं म्हणजे चित्रकला चांगली असणारी मुलं. या दोन कॅटेगरीज सोडल्या तर नकाशा रेखन आणि वाचन फारसं कोणाला आवडत नाही.
पण आज आपण या नकाशासारखा एक वेगळा नकाशा बनवायचा का? तोही घराच्या बाहेर न पडता. तो म्हणजे आपल्या घराचा. आपलं घर छप्पर काढून टाकून आकाशातून बघितलं तर कसं दिसेल याचं उत्तर म्हणजे नकाशा. तर असा आपल्या घराचा नकाशा काढायचा का?


त्यासाठी आपल्याला आधी पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण आपल्या घराच्या कुठल्या बाजूला आहेत ते बघावं लागेल. मग आपल्या संपूर्ण घराची एकूण लांबी-रुंदी मोजावी लागेल. त्यातल्या सगळ्या खोल्यांच्या जागा समजून घ्यायला लागतील. मग प्रत्येक खोलीची लांबी रुंदी मोजावी लागेल. भिंती किती रुंद आहेत, दारं कुठे आहेत, ती आत उघडतात की बाहेर हे बघायला लागेल. हे सगळं मोजमाप करून झालं की नकाशातल्या अंतराचं प्रमाण ठरवायला लागेल. म्हणजे एक फूट = किती सेंटीमीटर हे ठरवायला लागेल. मग एक कोरा कागद घ्यायचा. पट्टी पेन्सिल घ्यायची, आणि डायरेक्ट नकाशा काढायला सुरुवात करायची. नकाशा काढा. आणि मग त्यात अजून काय घालता येतंय ते बघा. म्हणजे तो नकाशा पाण्याच्या नळ आणि ड्रेनेजचा असू शकतो, इलेक्र्टिकल वायरिंगचा असू शकतो किंवा फर्निचरचाही असू शकतो. करून तर बघा!

Web Title: lockdown - DIY - make your home map. stay at home- kids acitivity.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.