आपण आपलंच कार्टून बनवलं तर? - ट्राय कर के देखो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 08:00 AM2020-05-01T08:00:00+5:302020-05-01T08:00:07+5:30

तुम्ही स्वत:ची व्यंगचित्र-मालिका बनवू शकता. कशी? - तीच तर आयडिया इथे सुचवलीये!

lockdown - DIY - make your own cartoon seris.. kids activity -stay at home | आपण आपलंच कार्टून बनवलं तर? - ट्राय कर के देखो..

आपण आपलंच कार्टून बनवलं तर? - ट्राय कर के देखो..

Next
ठळक मुद्दे हसून हसून लोटपोट

तुम्हाला किस्से सांगता येतात? जोक्स सांगता येतात? थोडीफार चित्रं काढता येतात? नवीन किस्से किंवा गोष्टी सुचतात? लोकांना शेंड्या लावायला मजा येते? मग आज तुमच्यासाठी एक भारी ?क्टिव्हिटी आहे. तुम्ही तुमचं तुमचं कॉमिक तयार करू शकता.
त्यासाठी काही फार लागत नाही. खरं तर कागद आणि पेन्सिल इतकंच साहित्य त्यासाठी लागतं. पण डोकं मात्र भरपूर चालवायला लागतं. आधी तुम्हाला कुठला किस्सा सांगायचा आहे ते ठरवायला लागेल. मग त्यातली पात्र कुठली असतील ते ठरवायला लागेल. मग तो किस्सा कमीत कमी किती चित्रंमध्ये सांगता येईल ते ठरवायला लागेल. मग त्याचं प्रत्यक्ष चित्र काढायला लागेल आणि शेवटी प्रत्येक पात्रचे संवाद लिहायला लागतील.
पण हे सगळं वाटतं तितकं काही अवघड नाहीये.


उदाहरणार्थ बघा हं. तुम्ही तो जोक तर ऐकला असेल ना? की एक मुलगा म्हणतो,  की,  ‘आई, अशी कशी खीर केलीस तू? नुसतं दूधच पोटात गेलं आणि तांदूळ सगळे वाटीतच राहिले!’
त्यावर आई म्हणते,  ‘अरे आधी मास्क तरी काढ चेहे?्यावरचा!’
यांच्यात दोनच पात्र आहेत. आणि दोनच चित्रत कॉमिक बनवता येऊ शकतं. तर याचं कॉमिक तुम्ही ट्राय करू शकता. किंवा असे अनेक जोक्स सध्या फॉरवर्ड होत आहेत. त्यातला एखादा कमी पात्र आणि कमी चित्र असलेला जोक घेऊन त्याचं कॉमिक बनवा. आत्ता ते तुम्हाला फक्त घरातल्या लोकांना दाखवता येईल. पण तुम्ही जर खरंच चांगलं कॉमिक बनवलंत, तर शाळा सुरु झाल्याच्या नंतर तुम्ही शाळेत भाव खाणार हे नक्की!


 

Web Title: lockdown - DIY - make your own cartoon seris.. kids activity -stay at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.