पत्थर के फुल ! दगड पेंट करायची ही भन्नाट ट्रिक वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 07:45 AM2020-04-29T07:45:00+5:302020-04-29T07:45:01+5:30
तुम्हाला थोडे दगड मिळतील का? ते आणा शोधून, आज आपण त्यांची मज्ज करूया!!
तुमच्या घराच्या खाली किंवा बाहेर अंगणात दगड आहेत का? लगेच त्याच्यावर पीजे मारायचे नाहीत. की आम्हालाच घरातले सगळे दगड म्हणतात, अजून कशाला बाहेरचे दगड वगैरे बोअर करायचं नाही अजिबात!
एकदम सिरियसली सांगा की बाहेर कुठे दगड आहेत का? म्हणजे साधारण दोन इंच व्यासाचे. थोडे लहान- मोठे चालतील. त्यात जर का गुळगुळीत गोटे सापडले तर फारच भारी. पण समजा गुळगुळीत गोटे नसतील आणि ओबडधोबड दगड असतील तरी चालतील.
असे पुरेसे दगड गोळा करा. पुरेसे म्हणजे साधारण दोन पासून दहापयर्ंत कितीही. आता तुमचे वॉटर कलर्स शोधा. ब्रश, रंग मिक्स करायची डिश असं सगळं शोधा. ते सगळं सापडलं, की ते आणलेले दगड स्वच्छ धुवून घ्या. मग पुसून घ्या.
आता आपल्याला ते दगड रंगवायचे आहेत. हसू नका! खरंच रंगवायचे आहेत. तुम्हाला जेवढी चित्रकला येत असेल त्यानुसार तुम्ही त्यावर काय चित्र काढायचं ते ठरवू शकता. बाकी काही सुचत नसेल तर निदान छोटंसं पान- फूल, होडी, सूर्य, चंद्र आणि चांदण्या अशी सोपी चित्र तर तुम्ही त्यावर नक्की रंगवू शकता.
हे रंगवलेले दगड अतिशय छान दिसतात. आणि ते तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वापरून शकता. म्हणजे सगळ्यात आधी तर पेपर वेट म्हणून ते वापरू शकता. किंवा बाथरूममध्ये किंवा हॉल मध्ये एखाद्या कोप?्यात या दगडांचं डेकोरेशन करू शकता. त्यासाठी आधीच ठरवून एकाच थीमने दगड रंगवू शकता. म्हणजे वेगवेगळी फुलं किंवा बॅकग्राउंड काळी करून वर चंद्र चांदण्या किंवा बॅकग्राउंड पाण्यासारखी निळी करून त्यावर मासे, ऑक्टोपस, कासव असं काढू शकता.
पण दगड रंगवून निदान घराचा एक कोपरा तरी तुम्ही छान डेकोरेट करू शकता.