छलका रे कळशी का पानी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 05:04 PM2020-05-27T17:04:53+5:302020-05-27T17:15:20+5:30
पाणी वाचवण्याची एक सोपी युक्ती आज शिकूया.
- मराठी विज्ञान परिषद, - पुणे विभाग
साहित्य
छोट्या तोंडाची कळशी, पाणी, प्लॅस्टिकचा कागद, रबर बँड, खिळा.
कृती:
1. एक छोट्या तोंडाची कळशी घ्या. ती पाण्याने पाऊण पातळीपयर्ंत भरा.
2. कळशीच्या तोंडावर एक प्लॅस्टिकचा कागद ताणून बसवा. रबर बँड लावून तो पक्का बसवा.
3. एक खिळा घेऊन या कागदावर भोके पाडा.
4. कळशी पटकन उपडी करा. उपडी केली तरी कळशीतून पाणी पडणार नाही.
5. कळशी थोडी तिरपी करा. पाणी पडायला लागेल. पुन्हा उभी करा पाणी यायचे थांबेल.
6. ही युक्ती आत्मसात करून पाणी वाचवा.
असं का होतं?
कळशी उपडी केल्यावर बाहेरील हवेच्या दाबामुळे पाणी पडत नाही.
तिरपी किल्यावर आत हवा शिरते आणि तेवढे पाणी बाहेर पडते