हवेचे खेळ आणि चिपको झाकण , बघा ही जादू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 07:30 AM2020-05-05T07:30:00+5:302020-05-05T07:30:07+5:30
फुंकर आणि झाकण
- मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
साहित्य
स्टीलचा पेला, प्लॅस्टिकचे झाकण.
कृती
1. एक स्टीलचा पेला घ्या.
2. पेल्याच्या तोंडापेक्षा मोठ्या आकाराचे प्लॅस्टिकचे हलके झाकण घ्या.
3. डाव्या हातात पेला उलटा धरा.
4. त्याच्या तोंडाखाली झाकण ठेवून ते उजव्या हाताच्या मधल्या बोटाने हलके दाबा.
5. बोट काढा. झाकण खाली पडते.
6. आता पेल्यात गरम फुंकर घालून पटकन पेला उलटा धरा.
7. त्याच्या तोंडाखाली झाकण ठेवून ते उजव्या हाताच्या मधल्या बोटाने हलके दाबा.
8. बोट काढा. झाकण पेल्याला चिकटून राहाते.
असे का होते?
गरम फुंकरीमुळे पेल्यातील हवा विरळ होते, झाकण लावून गार झाल्यावर तिचा दाब कमी होतो. बाहेरच्या हवेच्या दाबामुळे झाकण पक्के बसते.