कौन है जो डूब गया ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 07:00 AM2020-05-28T07:00:00+5:302020-05-28T07:00:07+5:30
काय विरघळतं आणि काय नाही?
एक खूप सोपा पण खूप मजेशीर प्रयोग आज आपण करूया. यासाठी फार साहित्याची गरज नाही. मोठ्यांची विशेष मदत लागत नाही. छोट्या भावंडांना बरोबर घेऊन केलात तर आणखीनच मज्जा येईल.
साहित्य:
एक मोठा बाऊल, पाणी, मीठ, खायचा सोडा, डाळ, तांदूळ, कॉफी, लवंगा, वेलदोडे, कमळफुलं किंवा घरात असलेले कुठलेही मसाल्याचे पदार्थ. कागद, पेन.
कृती:
1) बाऊलमध्ये पाणी ओता.
2) आता त्यात एक पदार्थ घाला, विरघळतोय का बघा.
3) कागदावर पदार्थ आणि पाण्यात तो विरघळला कि नाही याची नोंद लिहा.
4) ते पाणी आता टाकून द्या आणि बाऊलमध्ये परत पाणी भरा. आणि दुसरा पदार्थ टाका. तो विरघळतोय का बघा.
5) अशी क्रिया तुम्ही जेवढे म्हणून पदार्थ घेतलेले आहेत त्या प्रत्येकासाठी करा आणि त्याच्या नोंदी घ्या.
6) कुठले पदार्थ पाण्यात विरघळतात आणि कुठले नाही याच्या नोंदींवरून एक छानसा चार्ट तयार करा आणि तुमच्या खोलीत लावा.