लांबूनच मेणबत्ती पेटवणारी ही पहा जादू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 07:45 AM2020-05-03T07:45:00+5:302020-05-03T07:45:02+5:30
मेणबत्तीदुरून पण पेटू शकते का? - आज पाहूया!
- मराठी विज्ञान परिषद, पुणो विभाग
साहित्य - मेणबत्ती, काड्यापेटी.
कृती -
1. एक मेणबत्ती घ्या.
2. स्टॅंडवर किंवा बशीत किंवा पक्क्या आधारावर ठेवा.
3. काड्यापेटीने मेणबत्ती पेटवा. तिची ज्योत चांगली स्थिर होऊ द्या.
4. मेणबत्ती एकाच फुंकरीत पटकन् विझवा.
5. मेणबत्तीच्या विझलेल्या ज्येतीतून एक धुराची रेषा वर गेलेली दिसेल.
6. ती रेषा अखंड असतानाच एक काडी पेटवून धुराच्या रेषेच्या टोकाला लावा.
7. एक बारीक ज्योत मेणबत्तीच्या वातीपयर्ंत जाताना दिसेल.
8. मेणबत्ती पुन्हा प्रज्वलीत होईल.
9. धुराची रेषा अखंड नसेल तर तसे होणार नाही.
असं का होतं?
1. मेणाचा धूर किंवा कोणतीही गोष्ट पेटण्यासाठी तिचे तापमान पेट घेण्यालायक असायला लागते
2. शिवाय एक ज्योत किंवा ठिणगी तरी लागते.