कोणत्याही वस्तूला दूध पाजा ! - खरंच ..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 11:58 AM2020-05-08T11:58:51+5:302020-05-08T11:59:36+5:30
तुम्हाला खरं नाही वाटणार, पण हे करता येऊ शकतं. करा ट्राय!
Next
ठळक मुद्देघराला बनवा तुमची प्रयोगशाळा
- मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
साहित्य
विविध प्रकारच्या वस्तू, दूध, चमचा, लाकडी फळी, फडके.
कृती
1. एक लाकडी फळी घ्या.
2. फळीवर स्वच्छ फडके नीट पसरा.
3. फडक्यावर एक वस्तू स्थर राहील अशी ठेवा.
4. एका चमच्यात चमचाभर दूध घ्या.
5. चमच्याची कड वस्तूच्या पृष्ठभागाला टेकवा. चमचा किंचित तिरपा करा.
6. चमच्यातले दूध हळुहळू कमी होताना दिसेल.
7. दुधाचा पातळ थर वस्तूवरून सरकताना दिसला नाही तरी फडके दूधाने ओले झालेले दिसेल.
असे का होते?
दूधाच्या पृष्ठभागावरून थोडेसे दूध वस्तूच्या पृष्ठभागावर आले की त्यातल्या पाण्याच्या कणांच्या ओढीने चमच्यातील दूध ओढले जाते.
.