साखरेतून कधी उजेड पडतो का ? try करून पाहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 03:22 PM2020-05-04T15:22:39+5:302020-05-04T15:25:46+5:30
साखर कुटायला घेतलीत, तर तुम्हाला हा उजेड पाहाता येईल.
ठळक मुद्देघराला बनवा तुमची प्रयोगशाळा
- मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
साहित्य
जाड साखर, फरशी, बत्ता
कृती
1. हा प्रयोग पूर्ण अंधारात करायला हवा.
2. एक गुळगुळीत फरशी घ्या. ओटा किंवा दगडी पोळपाट चालेल.
3. त्याच्यावर थोडी साखर पसरा.
4. हातात बत्ता घ्या.
5. पूर्ण अंधार करा.
6. बत्त्याने दाबत साखर चुरडा.
7. चुरडताना निळसर उजेड पडलेला दिसेल.
असं का होतं?
साखरेचे स्फटिक बनत असताना त्यात कुठे कुठे आयन अडकून पडलेले असतात.
साखर चुरडताना ते हवेशी संपर्कात येतात.
त्यांची रासायनिक क्रिया होते त्यावेळी उजेड रुपात ऊर्जा बाहेर पडते.