सिखो ना , फॉरेन  लेन्गवेज घरबसल्या  चकटफू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 07:25 AM2020-04-28T07:25:00+5:302020-04-28T07:25:02+5:30

कुठल्याही परदेशी भाषा तुम्ही घरात बसल्या बसल्या शिकू शकता. कशा?

lockdown : DIY - screen time- make it useful-learn foreign language | सिखो ना , फॉरेन  लेन्गवेज घरबसल्या  चकटफू !

सिखो ना , फॉरेन  लेन्गवेज घरबसल्या  चकटफू !

Next
ठळक मुद्देआज तुम्ही काहीतरी बघणारच, तर काय बघाल?


ऑनलाईन शिका भाषा 
बैठे बैठे क्या करें 
करना है कुछ काम..
- ही अंताक्षरी नंतर खेळा, तुम्हाला माहित आहे का की इंटरनेटवर तुम्ही भारतातल्या मराठी सोडून इतर भाषा शिकू शकता इतकंच नाही तर जगातल्याही अनेक भाषा तुम्हाला शिकता येऊ शकतात. इंटरनेटवर फी भरून भाषा शिकवणा?्या साईट्स आहेत तशाच मोफत विविध भाषांचे धडे देणा?्या साइट्सही आहेत. 
युट्युबवर अनेक चॅनल्स आहेत, ज्यावरून तुम्ही तुम्हाला हवी ती देशी किंवा परदेशी भाषा शिकू शकता. आता घरात आहात तर जापनीज, स्पॅनिश, फ्रेंच, अरबी किंवा बंगाली, मल्याळी अशी तुम्हाला हवी ती भाषा शिका. वेळही मस्त जाईल आणि एक संपूर्ण नवी भाषा तुम्हाला शिकता येईल. निरनिराळ्या लिपी कशा लिहायच्या, अक्षरांची वळणं कशी काढायची हे शिकवणा?्या साईट्स आणि युट्युब व्हिडीओजही आहेत. तेही तुम्ही बघू शकता. काही अँप्सही आहेत ज्यावरुन तुम्हाला भाषा शिकता येऊ शकते. सध्या लॉक डाऊनमुळे कुठलाही क्लास लावता येऊ शकत नाही मग घरच्या घरी तुम्हाला भाषा शिकता येतील. 
बरं, हे सगळं करताना सुरुवातील आईबाबांची मदत घ्यायला विसरू नका. तुम्ही बघत असलेला व्हिडीओ, साईट किड्स फ्रेंडली आहे ना हे त्यांना चेक करू देत. म्हणजे मग शिकायला तुम्ही मोकळे. 

भारतीय भाषा शिकवणाऱ्या  साईट्स

https://www.languageshome.com/
http://www.languagereef.com/
https://www.dwibhashi.org

परदेशी मोफत भाषा शिकवणाऱ्या काही साईट्स

https://www.futurelearn.com
https://www.duolingo.com/
http://www.bbc.co.uk/languages/index
https://www.italki.com/home

Web Title: lockdown : DIY - screen time- make it useful-learn foreign language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.