आपला मेंदू १०० टक्के वापरता येतो ? आणि वापरला तर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 07:10 AM2020-04-20T07:10:00+5:302020-04-20T07:10:02+5:30

माणसाला त्याचा मेंदू शंभर टक्के वापरता आला तर?

lockdown -DIY - screen time- watch your brain, see how it works. | आपला मेंदू १०० टक्के वापरता येतो ? आणि वापरला तर ?

आपला मेंदू १०० टक्के वापरता येतो ? आणि वापरला तर ?

Next
ठळक मुद्दे बापरे, असं झालं तर?

स्क्रीन टाइम 
आपला मेंदू आपण 1क्क् } वापरला तर? काय काय होऊ शकतं तुम्ही कधी विचार केलाय?आपण एका रात्रीत बिलिनिअर कंपनी उभी करू शकतो. जगातली प्रत्येक भाषा शिकू शकतो.
शाळेचा वर्षभराचा अभ्यास एखाद महिन्यात संपवू शकतो.
पण मग आपण हे का करत नाही?
कारण आपण आपला मेंदू 100 टक्के वापरतच नाही असं विज्ञान म्हणतं. आपला मेंदू खूप गुंतागुंतीचा आहे. आपला मेंदू काय काय करू शकतो याची आपल्याला अजून पूर्ण कल्पनाही नाही. तुम्हाला माहितीये, आपण फक्त आपला 10 टक्के मेंदू वापरतो. म्हणजे उरलेला 90 टक्के वापरायचा ठरलं तर कल्पना करा काय धम्माल येईल. 
आपण लिमिटलेस होऊ. म्हणजे आपल्याला काहीही करता येईल. कुणीही आपल्याला रोखू शकणार नाही. म्हणूनच बहुदा आपला मेंदू गुंतागुंतीचा ठेवून निसर्गाने आपली कमाल दाखवली आहे. नाहीतर सगळ्याच माणसांचे मेंदू इतके भारी झाले तर भारी डोक्याची माणसं पृथ्वीचं काय करून ठेवतील? कुणास ठाऊक..? खूप चांगलं काहीतरी.किंवा नाशही!


तर ते जाऊद्या. 
आता युट्युबवर जा. 
टाईप करा brain usage 100 percent   असं इंग्लिशमध्ये टाईप करा. 
खूप इंटरेस्टिंग व्हिडीओज बघायला मिळतील. हे सगळं काल्पनिक आहे, पण म्हणून काय झालं, आपल्याला कल्पनेच्या जगात रमायला आवडतंच; नाही का?

Web Title: lockdown -DIY - screen time- watch your brain, see how it works.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.