ही पेन्सिल नजरबंदी करते ! -खरंच, हे पहा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 06:43 PM2020-04-11T18:43:45+5:302020-04-11T18:49:43+5:30
दुपारी सगळे झोपल्यावर घरी बसून करायचे उद्योग
- राजीव तांबे
साहित्य:
पेन्सिल. काचेचा ग्लास. काचेची मोठ्या तोंडाची बाटली. एक लिटर पाणी.
तर करा सुरू :
1. अर्धा ग्लास पाण्याने भरा.
2. ग्लासात तिरकी पेन्सिल ठेवा.
3. आता पाण्यात बुडालेली पेन्सिल मोडलेली दिसेल आणि जाड पण दिसेल.
4. पेन्सिल ग्लास मधून बाहेर काढली की पुन्हा पहिल्यासारखी!
5. काचेची मोठ्या तोंडाची बाटली पाण्याने अर्धी भरा.
6. ग्लासातली पेन्सिल काढून बाटलीत तिरकी ठेवा.
7. काय फरक दिसतो? बाटलीतली पेन्सिल अधिक जाड दिसते की ग्लासातली?
8. दोन्ही ठिकाणी पेन्सिल मोडलेली दिसते पण दोन्ही ठिकाणच्या जाडीत फरक आहे, हे मात्र निश्चित.
असं का होतं :
प्रकाश नेहमी एका सरळ रेषेत प्रवास करतो. आणि प्रत्येक माध्यमात त्याची प्रवास करण्याचीगती ही वेगवेगळी असते. म्हणजेच पाण्यातून आणि काचेतून प्रवास करताना प्रकाश किरणांची गती वेगवगेळी असते. त्यामुळेच एका माध्यमातून दुसयर माध्यमात प्रवेश करताना प्रकाश किरणांची दिशा बदलते. ते वाकतात. पेन्सिलीच्या वरील भागातून येणारे किरण हे हवेतून येतात तर तिच्या खालील भागातून येणारे किरण हे पाण्यातून येतात.
किरणांच्या गतीतील फरकांमुळे खालील किरण वाकडे होऊन डोळ्यांकडे येतात. हे येणारे प्रकाश किरण वाकल्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष पेन्सिल असते त्यापेक्षा किंचित सरकल्यासारखी दुसर्याव जागी दिसते. म्हणजेच मोडल्यासारखी वाटते.
ग्लासाची काच गोल असते. ग्लासाची गोल काच आणि पाणी यामुळे पेन्सिलीपासून येणारे प्रकाश किरण भिंगातून आल्याप्रमाणो पसरतात. यामुळेच पेन्सिल आपल्याला जाड दिसते.ग्लास आणि बाटली यांची गोलाई व काचेची जाडी भिन्न असल्याने, पेन्सिलीची जाडी कमी-जास्त दिसते.