कधीकधी सावली स्पष्ट दिसते, कधीकधी फिस्कटल्यासारखे! - असं का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 06:32 PM2020-05-14T18:32:04+5:302020-05-14T18:32:31+5:30

घराला बनवा तुमची प्रयोगशाळा

lockdown - diy - shadow experiment. | कधीकधी सावली स्पष्ट दिसते, कधीकधी फिस्कटल्यासारखे! - असं का ?

कधीकधी सावली स्पष्ट दिसते, कधीकधी फिस्कटल्यासारखे! - असं का ?

Next
ठळक मुद्देपहा हातावरच्या बारीक लवेची सावलीसुद्धा अगदी रेखीव दिसेल. पापणीच्या केसाची सावलीसुद्धा रेखीव दिसेल.  

- मराठी विज्ञान परिषद, पुणे  विभाग

लख्ख उन्हात पडलेली तुमची सावली तुम्ही कधी निरखून पहिलीत का? पायाची सावली आणि डोक्याची सावली यात कोणता फरक दिसतो का? पहा.
 पायाच्या सावलीची कड डोक्याच्या सावलीच्या कडेपेक्षा रेखीव दिसते. याचं कारण काय असावं? 
ट्यूबलाईटच्या उजेडामुळे पडलेली तुमची सावली कशी पडते? फिसकटल्यासारखी दिसते. कारण टयूबलाईट हा प्रकाशाचा विस्तारीत स्नेत आहे. सूर्य हा ट्यूबलाईटइतका नाही पण विस्तारीतच स्नेत आहे. त्यामुळे जमिनीच्या जवळ असल्यामुळे पडलेली पायाची सावली जेवढी फिसकटल्यासारखी दिसते त्यापेक्षा डोक्याची सावली जास्त फिसकटल्यासारखी दिसते. 
आपल्याला आपली सावली अगदी स्पष्ट आणि रेखीव हवी असेल तर काय करायचे? एक युक्ती आहे. 
एक आरसा घ्या. सपाट नाही. वाहन चालकाला मागचे दृष्य दिसावे म्हणून वापरतात तो आरसा घ्या. त्याला बहिर्गोल आरसा म्हणतात. तो घराबाहेर उन्हात ठेवा. त्याच्यावरून परावर्तीत होणारा प्रकाश एखाद्या अंधा?्या खोलीतून आत भिंतीवर पडू द्या. 
खोलीत जा. हा प्रकाश पहा. जरा कमी प्रखर दिसतो का? या प्रकाशात तुमचा हात धरा. पहा हातावरच्या बारीक लवेची सावलीसुद्धा अगदी रेखीव दिसेल. पापणीच्या केसाची सावलीसुद्धा रेखीव दिसेल.  
अशाच प्रकारे दंतुर पानांच्या कडांची सावलीसुद्धा रेखीव दिसेल. या सावलीत कडांचे अनेक बारकावे दिसतील.
याचा उपयोग करून तुम्हाला कसल्या कसल्या आकृत्या छान काढता येतील? मुळात बहिर्गोल आरशामुळे इतकी काटेकोर सावली का पडत असेल?
सूर्य हा प्रकाशाचा विस्तारीत स्नेत आहे तो बहिर्गोल आरशावरून परावर्तीत होताना बिंदुरुप होतो. त्यामुळे स्नेत जेवढा लहान तेवढी सावलीची कड धारदार 

 

Web Title: lockdown - diy - shadow experiment.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.