क्लिप्सचं  फुलपाखरू उडवायचं  का ? फु>>>>>>>

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 01:49 PM2020-04-11T13:49:36+5:302020-04-11T13:52:36+5:30

क्लिप्स घ्या खेळायला! त्यांना कागद लावून तुम्ही किती काय काय गंमती करू शकता!

lockdown -Diy- stay at home activity for kids with clips. | क्लिप्सचं  फुलपाखरू उडवायचं  का ? फु>>>>>>>

क्लिप्सचं  फुलपाखरू उडवायचं  का ? फु>>>>>>>

Next
ठळक मुद्दे तुमच्या गच्चीत अशा रंगीबेरंगी क्लिप्स बघून शेजार पाजारचेही खुश होतील बघा. 

साहित्य: 
कपडे वळत घालायच्या प्लॅस्टिकच्या क्लिप्स किंवा पिना,रंगीत कागद, घरात किंवा अंगणात असलेली पाने, रंग, स्केच पेन्स, डिंक 
कृती :
1. क्लिप्सच्या आकाराचे रंगीत कागद कापून घ्या आणि ते क्लिप्सवर चिकटवा. 
2. आता या कागदावर तुम्हाला हवे ते रंग लावा. 
3. त्यांना नाक डोळे काढा. 
4. एखाद्या क्लिपसाठी फुलपाखराचे पंख रंगीत कागदातून कापून घ्या. आणि क्लिपला दोन्ही बाजूंनी चिकटवा. 
5. एखाद्या क्लिपवर माणसांचे चेहरे काढून त्याला लोकरीचा दोरा मफ्लरसारखा गुंडाळा. 
6. एखाद्या क्लिपवर लाल रंग देऊन काळे ठिपके द्या अंडी त्याची लेडी बग बनवा. 
7. एखाद्या क्लिपला हिरवा गर रंग देऊन हात पाय जोडून नाकतोडा करा. 
8.तुम्हाला हवे ते प्राणी, पक्षी, काटरून्स तुम्ही या क्लिप्सच्या साहाय्याने बनवू शकता. 
या क्लिप्स एकमेकांना बांधून त्यांची सुरेख माळ करू शकता. 


नाहीतर आईबाबांना सांगा, कपड्यांना तुम्ही बनवलेल्या क्लिप्सचं लावायच्या. 
मग गंमत बघा, एखाद्या शर्टवर नाकतोडा बसेल, एखाद्या टॉपवर फुलपाखरू. तुमच्या शॉर्टससाठी खास फुटबॉलची क्लिपही तुम्ही बनवू शकता. आणि फ्रॉकसाठी सुंदर रिबीनची. 
आहे कि नाही मज्जा. आजूबाजूच्या काही अस्वस्थ वातावरणात तुमच्या गच्चीत अशा रंगीबेरंगी क्लिप्स बघून शेजार पाजारचेही खुश होतील बघा. 

Web Title: lockdown -Diy- stay at home activity for kids with clips.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.