पाठी पाठी- फुगा फुगा खेळणार का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 01:29 PM2020-04-11T13:29:42+5:302020-04-11T13:33:32+5:30
चालताना फुगा खाली पडता कामा नये. फुगा खाली पडला तर तो गट बाद.
- राजीव तांबे
पाठी पाठी खेळासाठी आपल्याला हवे आहेत दोन मोठे फुगे आणि एक खडू.
खेळायचीतयारी :
हा खेळ किमान चार जणात खेळता येईल.
दोन-दोन जणांचे दोन गट खेळतील. पहिल्या गटात सारा आणि आजोबा.
दुसर्या गटात अन्वय आणि आई आहेत.
प्रत्येक गटाला एक मोठा फुगा द्या.
फुगा फुगवा.
खेळाडू जिथून खेळायला सुरुवात करणार आहेत तिथून सरळ 20 पावलांवर (5 मीटर अंतरावर)एक रेषमारा.
तर करा सुरू :
1. आता दोन्ही गटातील खेळाडू एकमेकांकडे पाठ करुन उभे राहतील.
2. एक फुगवलेला मोठा फुगा सारा आणि आजोबा या दोघांच्यापाठी असा ठेवायचा की हे दोघे आपापल्या पाठीने हा फुगा दाबून धरतील.
3. तसेच फुगवलेला दुसरा मोठा फुगा अन्वय आणि आई या दोघांच्या पाठी ठेवायचा.
4. दोघांनी मिळून हा फुगा सांभाळत धावत किंवा जोरजोरात चालत जाऊन समोरची 20 पावलांवरची रेषा ओलांडायचीआहे.
5. चालताना फुगा खाली पडता कामा नये. फुगा खाली पडला तर तो गट बाद.
फुगा न पडण्यासाठी त्यावर एका दिशेने दाब द्यायचा व दुसर्याच दिशेन ेचालायचे हे या खेळातले मोठे कौशल्यआहे. ..