घिसते रहो अच्छा लगता है ! -हा भांडी घासायचा खेळ आहे बाबू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 09:56 AM2020-04-11T09:56:56+5:302020-04-11T09:58:02+5:30

त्यानिमित्त गारेगार पाण्यात खेळण्याचा चान्स मिळेल, तो का सोडता?

lockdown-DIY- wash your plates @ home kids, its a big fun, try it! | घिसते रहो अच्छा लगता है ! -हा भांडी घासायचा खेळ आहे बाबू !

घिसते रहो अच्छा लगता है ! -हा भांडी घासायचा खेळ आहे बाबू !

googlenewsNext
ठळक मुद्देभांडी घासतो या निमित्ताने आपल्याला गारेगार पाण्यात जितका वेळ घालवायला मिळतो तो इतर कुठल्याही कारणाने मिळत नाही.

- गौरी पटवर्धन


तुम्ही कधी भांडी घासली आहेत? मुलींनी कधी ना कधी घासली असतील. काही मुली नेहेमीच घासत असतील. पण मुलग्यांनी? जनरली त्यांनी भांडी घासलेली नसतात. कधीच घासलेली नसतात. अनेक घरात मुलग्यांना आपण जेवलेलं ताट उचलून ठेवायची सुद्धा सवय नसते. ते काम सुद्धा आई, बहीण किंवा वहिनीच करते. पण सध्याच्या परिस्थितीत घरातल्या प्रत्येकावर कामाचा अतिरिक्त ताण आहे. अशा वेळी आपण मदत म्हणून घरातलं एखादं काम करायला काय हरकत आहे?
असा विचार केला तर आपल्याला घरातली अनेक कामं दिसू शकतात. गाद्या घालणो / काढणो, घराचा केर काढणो, घर पुसणो, स्वयंपाक करणो वगैरे वगैरे. पण आत्ता तरी आपण फक्त भांडी घासण्याबद्दल विचार करूया. त्याची कारणं तीन. 
पहिलं म्हणजे ते काम करायला विशेष शिकावं लागत नाही. फक्त कुठलं भांडं घासतांना कुठे लक्ष द्यायचं हे समजून घ्यायला लागतं. म्हणजे चहाचा कप हा कायम जिथे तोंड लावलं जातं तिथे आणि कानाच्या वरच्या आणि खालच्या टोकाच्या मध्ये हटकून खराब होतो. सगळे चमचे, उलथनं, डाव वगैरेंची मागची बाजू, जिथे दांडा चमच्याला मिळतो तिथे कळकट्ट होतात. अश्या प्रत्येक भांड्याच्या घाण राहण्याच्या सीक्रेट जागा असतात. त्या शोधून समजून घेऊन घासाव्या लागतात.
दुसरं म्हणजे भांडी घासणो हे काम शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या कॅटेगरीतलं काम आहे. कुठलं भांडं पाण्यात भिजवून ठेवायचं, कुठल्याला साबण लावून ठेवायचा, कुठलं गरम पाण्यात धुवायचं, कुठल्याला प्लॅस्टिकची घासणी आणि कुठल्याला तारेची घासणी याचा विचार करायला लागतो. म्हणजे ते काम सोपं होतं.

तिसरं म्हणजे सकाळपासून सगळ्यांचा स्वयंपाक करून दमलेल्या आईला / बहिणीला किमान नंतरची आवराआवर करायला लागली नाही, तरी त्यांना पुष्कळ आराम मिळतो.
आणि आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं! भांडी घासतो या निमित्ताने आपल्याला गारेगार पाण्यात जितका वेळ घालवायला मिळतो तो इतर कुठल्याही कारणाने मिळत नाही. करून बघा! किती वेळ पाण्यात खेळतोयस? ऊठ आता असं कोणीही म्हणणार नाही!

 

Web Title: lockdown-DIY- wash your plates @ home kids, its a big fun, try it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.