रिचर्डने तयार केला सिंहांना घाबरववणारा ‘लायन लाईट’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 07:10 AM2020-04-14T07:10:00+5:302020-04-14T07:10:02+5:30
सिंहांना घाबरवणारा रिचर्ड
ही गोष्ट आहे रिचर्ड तुरेरेची. तो केनियातल्या नैरोबी नॅशनल पार्कच्या दक्षिणोकडे एका छोट्या गावात राहतो. गाव जंगलाच्या अगदी जवळ. वन्य प्राणी आणि स्थलांतरित ङोब्रे त्याच्या गावाच्या आजूबाजूला नेहमी फिरतात. मग त्यांच्या पाठीमागे शिकारीसाठी सिंह ही येतात. ङोब्र्यांच्या बरोबर गावातली गाईगुरंही शिकार होतात. रिचर्ड मसाई जमातीचा आहे. गुरांची शिकार कशी थांबवायची हा सगळ्याच जमातीपुढे मोठा प्रश्न होता. एकदिवस त्याचाही लाडका बैल शिकार झाला. त्यांच्या घरात तेवढा एकच बैल होता. आता काय करायचं?
सिंहांच्या दहशतीवर उपाय शोधला पाहिजे असं त्याला फार वाटायला लागलं. पण तो चिमुरडा मुलगा. करणार काय? पण त्याने हार मानली नाही. त्याला हे माहित होतं कि सिंह आगीला घाबरतात. म्हणून मशाल दाखवून त्यांना पळवून लावायचा त्याने विचार केला. पण मशालीच्या उजेडात सिंहांना गाव अधिकच स्पष्ट दिसायला लागलं आणि त्यांचा फायदाच झाला.
आता काय?
मग त्याने बुजगावणं लावलं. पहिल्या दिवशी सिंह पळून गेले. पण दुस?्या दिवशी धीट झाले. बुजगावणं जागचं हालत नाही म्हटल्यावर सिंहांची भीती गेली. आता?
मग एक दिवशी रात्री तो घराभोवती फिरत असताना त्याच्या हातातल्या टॉर्चला सिंह घाबरले असं त्याच्या लक्षात आलं. हलणारा उजेड सिंहांना घाबरवतो हे त्याला समजलं. टॉर्च सतत हलता आणि उघडबंद होत राहिला तर सिंह गावाकडे फिरकणार नाही असं त्याला वाटलं. काही वस्तू गोळा करून रिचर्डने ‘लायन लाईट’ तयार केला. सिंह त्याच्या घराजवळ येणं बंद झालं. शेजारच्या आजीलाही एक बनवून दिला. हळूहळू त्याच्या संपूर्ण गावात लाईन लाईट लागले आणि सिंहांच्या त्रसापासून गाव वाचले. सिंहांचे हल्ले थांबल्यामुळे सिंहावर होणारे मानवी हल्लेही थांबले. आहे कि नाही भन्नाट गोष्ट. रिचर्डने ही गोष्ट स्वत: सांगितली आहे टेड टॉक मध्ये.
तुम्हाला बघायची असेल तर गुगल वर जा आणि इंग्रजीत टाईप करा- lion light richard turere.
रिचर्डचे भरपूर व्हिडीओज तुम्हाला बघायला मिळती.