गव्हांकुर मस्त घरीच रुजवले तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 01:24 PM2020-05-11T13:24:49+5:302020-05-11T13:34:33+5:30

गहू रुजत घालणं आणि त्यांचे अंकुर आले, की ते खाणं, त्यांचा रस करून पिणं, हे एकदम सोप्पं तर आहे!

lockdown - DIY -wheat grass juice- healthy experiment at home | गव्हांकुर मस्त घरीच रुजवले तर..

गव्हांकुर मस्त घरीच रुजवले तर..

Next
ठळक मुद्देघराला बनवा तुमची प्रयोगशाळा


- मराठी विज्ञान परिषद, पुणे  विभाग

सध्या कोविड-19 या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली आहे. घराबाहेर पडण्यामुळे विषाणूची लागण होण्याचा धोका आहे. तो टाळू या. या काळात भाजी फळांची कमतरता झाल्यामुळे आहारात जीवनसत्वे आणि खनिजे कमी प्रमाणात जातात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मयार्दा येते. ती टाळण्याचा एक प्रयोग करू. गव्हाचे तृणांकूर.

1. एक चमचाभर गहू एका सटात घ्या. गहू बुडतील एवढे पाणी घाला. 
2. 10 तास भिजू द्या. 10 तासानंतर पाणी काढून टाका. गव्हाला बारीक मोड आलेले दिसतील. 
3. एक पसरट ट्रे किंवा कुंडी घ्या. तसा तर तुम्हीच पुठ्ठ्याचा ट्रे बनवू शकाल तर ते वापरता येतील. 
4. ट्रेमध्ये अर्धा सेंटीमीटर जाडीचा मातीचा थर करा. त्या थरावर मोड आलेले गहू पसरा. त्यावर पुन्हा माती टाका. 
5. रोज त्याच्यावर पाणी शिंपडत रहा असे सात दिवस करायचे आहे. 
गव्हाच्या तृणांकूराची वाढ कशी होते त्याचे निरीक्षण करा. 


आठ दिवसांनी तृणांकूर वापरायला तयार होतात. तेव्हा त्याची हिरवागार पाने कातरून घ्या. त्या पानांचा मिक्सरमध्ये रस तयार करा आणि तो गाळून पिऊ शकता. 
या रसात प्रथिने, बीटा कॅरोटीन, व्हिटामिन ई, व्हिटामिन सी, व्हिटामिन बी12, तसेच फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह आयर्न, पोटॅशियम ही खनिजे असतात. असे आढळले आहे. 
करून तर पहा. घर बसल्या बसल्या पिक पिकवण्याचा अनुभव मिळेल. 

Web Title: lockdown - DIY -wheat grass juice- healthy experiment at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.