तुम्हाला ब्लॉग लिहायचा का ऑनलाइन ? आणि व्हायचं का स्टार रायटर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 01:26 PM2020-04-13T13:26:15+5:302020-04-13T13:27:35+5:30

तो तुमचा तुम्हाला सुरू करता येऊ शकतो. कसा काय? चला, आज शिकूया!

lockdown - DIY - write your blog -online- yes you can! | तुम्हाला ब्लॉग लिहायचा का ऑनलाइन ? आणि व्हायचं का स्टार रायटर ?

तुम्हाला ब्लॉग लिहायचा का ऑनलाइन ? आणि व्हायचं का स्टार रायटर ?

Next
ठळक मुद्देपब्लिश करा. झाला तुमचा ब्लॉग सुरु. 


 इंटरनेटवर एक विशेष जागा असते जिथे कुणीही लिहू शकतं. फेसबुक आणि इतर सोशल मीडियापेक्षा हे वेगळं असतं. याला म्हणतात ब्लॉग्स. आणि ब्लॉग्स लिहिणार्यांना म्हणतात ब्लॉगर्स. 
ब्लॉग म्हणजे काय?
अशी एक जागा जी तुमची असते. तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयावर या जागेत लिहू शकता. ब्लॉग लिहिण्यासाठी तुम्हाला एक आयडी काढावा लागतो. जसा ईमेल आयडी असतो तसंच. मग ते झालं कि तुमचा ब्लॉग तयार होतो. जिथे तुम्ही तुम्हाला हवं तेव्हा, हवं तेवढं लिहू शकता आणि हो कुठल्याही भाषेत लिहू शकता. अगदी मराठीतही. 
जगभर लहान मुलंही मोठ्या प्रमाणावर ब्लॉगिंग करतात. तुम्हाला ब्लॉग लिहायचा असेल तर तो सुरु कसा करायचा हे बघूया. 
1) ब्लॉगिंग करण्यासाठी गुगलवर जा आणि creat blog असा सर्च करा. 
2) तुम्हाला दोन पर्याय मिळतीलु blogger.com  आणि wordpress.com
3) यातला कुठलाही पर्याय तुम्ही निवडू शकता. 
4)साईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला sign up  किंवा create blog  असे ऑप्शन दिसतील. त्यावर क्लिक करा. 
5) आतमध्ये तुमचा मेल आयडी आणि इतर माहिती विचारली जाईल. ती भरा. 
6) ब्लॉग सुरु करण्यासाठी तुमच्याकडे एक मेल आयडी हवा. त्यामुळे आधी मेल आयडी काढा मग ब्लॉग सुरु करा. 
7) सगळे तपशील भरून झाले कि लगेच तुमचा ब्लॉग सुरु होईल. 
8) आतमध्ये निरनिराळी डिझाइन्स दिलेली असतात. त्यातलं तुमच्या आवडीचं डिझाईन तुम्ही निवडू शकता. 


9) मराठी ब्लॉग लिहिण्यासाठी गुगल इंडिक कीबोर्डचा वापर करता येतो. म्हणजे urjaa असं इंग्रजीत लिहिलं की कम्प्युटरवर ऊर्जा अशी अक्षरं उमटतात. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा लेख, कविता, अनुभव ब्लॉगवर लिहा आणि मग ते विचारेल, पब्लिश करायचा का? 
10) जर तुम्हाला पब्लिश करण्याची म्हणजेच जगाशी शेअर करण्याची इच्छा असेल तर पब्लिश करा. झाला तुमचा ब्लॉग सुरु. 

 


 

Web Title: lockdown - DIY - write your blog -online- yes you can!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.