काय ‘माकडचाळे’ चालवलेत तुम्ही हे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 07:20 AM2020-05-23T07:20:00+5:302020-05-23T07:20:06+5:30

पाहाच करून हे माकडचाळे आणि दाखवा आपल्या आईबाबांनाही. त्यामुळे तुमच्यात किती ताकद आली ते!.

lockdown - exercise at hime..monkey jump | काय ‘माकडचाळे’ चालवलेत तुम्ही हे?

काय ‘माकडचाळे’ चालवलेत तुम्ही हे?

Next
ठळक मुद्देयामुळे हातापायांत ताकद येईल.

.
 इकडे तिकडे उडय़ा मारायला, लोळायला, घरात समजा बेड, पलंग, सोफा अशा वस्तू असतील, तर खाली जमिनीवर पाय न ठेवता, पलंगावरुन बेडवर, बेडवरुन सोफ्यावर, सोफ्यावरुन खुर्ची किंवा टेबलवर. दाराला किंवा कुठेतरी लटकत, उडय़ा मारत आणि चालत जाण्याचा प्रयोगही तुमच्यापैकी अनेकांनी केला असेल. कित्ती मज्जा येते ना त्यात?
पण आपल्या आईबाबांनी त्यात नक्कीच मोडता घातला असेल. ढुंगणावर सण्णकन एखादा रट्टाही ठेवला असेल. असलेच काही उद्योग आपण शाळेतही केले असतील आणि सगळ्यांकडून एकच ऐकलं असेल. काय ‘माकडचाळे’ चालवलेत तुम्ही हे? नीट माणसासारखं बसता येत नाही का?
पण तुम्हाला सांगू?
- या माकडचाळ्यांत किती मज्जा आहे, हे या मोठय़ांना कोण सांगणार? खरं तर असे माकडचाळे त्यांनी स्वत:ही त्यांच्या लहानपणी केले असतील. पण विसरले असावेत आता सगळे. हो, पण उडय़ा मारत आपल्या वस्तू, घर, शाळा खराब करणं चूकच. 


माकड कसं उडय़ा मारतं, एका फांदीवरुन दुस:या फांदीवर कसं लटकतं, इकडून तिकडे उडय़ा मारत पळतं, हे त्याचे ‘माकडचाळे’ म्हणजे एक अतिशय उत्तम असा व्यायामप्रकार आहे. मार्शल आर्टमध्येही याचा वापर केला जातो. हा व्यायाम खूप वेगवेगळ्या पद्धतीनं करता येतो आणि त्यातली डिफिकल्टी लेवलही आपल्या सोयीनुसार आणि  वाढवता, कमी करता येते.
कसा कराल हा व्यायाम?
1- हा हालचालींचा एक प्रकार आहे. त्यातल्या त्यात सोपा प्रकार करु. गुडघे, हात, मुठी आणि पाय यांचा मुख्यत्वे वापर यात करायचा आहे. 
2- उखड बसा. हातांच्या मुठी वळा. 
3- अंग एकमद सैल सोडा. हातांच्या मुठी जमिनीवर टेकवा.
4- शक्यतो सपाट, खाली खडे, दगड, गोटे नसतील अशी जागा निवडा. आपल्या हातांच्या मुठी जमिनीवर ठेवा.
5- आता मुठींवर वजन देऊन आपलं शरीर उचला, एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे, एकदा समोर अशा जमतील तितक्या उडय़ा मारा.
यामुळे काय होईल?
1- यामुळे हातापायांत ताकद येईल.
2- आपली लोअर बॉडी स्ट्रॉँग होईल.
3- शरीराची लवचिकता वाढेल.
4- तुम्ही अधिक सतर्क आणि चपळ व्हाल. 
पाहाच करून हे माकडचाळे आणि दाखवा आपल्या आईबाबांनाही. त्यामुळे तुमच्यात किती ताकद आली ते!.
- तुमचीच माकडांची राणी, ऊर्जा

Web Title: lockdown - exercise at hime..monkey jump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.