आज तुम्ही मनिमाऊ व्हा आणि करा तिचा व्यायाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 07:30 AM2020-05-17T07:30:00+5:302020-05-17T07:30:02+5:30

कॅट स्ट्रेचिंग

lockdown - exercise at home cat stretching | आज तुम्ही मनिमाऊ व्हा आणि करा तिचा व्यायाम!

आज तुम्ही मनिमाऊ व्हा आणि करा तिचा व्यायाम!

Next
ठळक मुद्देआज आधी मांजर तर होऊन बघा.

तुम्हाला माहीत आहे, व्यायाम करण्यात माणूस सगळ्यात आळशी प्राणी आहे. निसर्गात सगळे पशू, पक्षी रोज व्यायाम करतात. निसर्गाकडून आणि आपल्याच आई-बाबांकडे बघून लहानपणापासून ते अनेक गोष्टी शिकत असतात. 
अनेक व्यायामप्रकार माणसानंही या प्राण्यांकडे बघूनच शिकले आहेत. मार्शल आर्ट्मध्ये तर अनेक प्रकार प्राण्यांचं निरीक्षण करून त्यानुसार माणसानं ते शिकून घेतले आहेत. 
कुंगफू, कराटेवाले, हाणामारीचे सिनेमे तुम्ही कधी पाहिले आहेत? नसतील तर काही सिनेमे नक्की बघा. कधी कधी आपल्या हिंदी सिनेमांतल्या मारामारीतही त्या अॅक्शन दाखवतात. साप, मुंगुस, माकड, वाघ लढाईत जसा पवित्र घेतात, त्याप्रमाणो मारामारीत त्या अॅक्शन आपल्याला पाहायला मिळतील. 
आज मी तुम्हाला सांगणार आहे, तो मांजरीचा व्यायाम.तुम्ही पाहिलंय, मांजर ब:याचदा आपले दोन्ही पाय पुढे ताणते, पाय जवळ घेऊन आपल्या पाठीचा पोक करून पाठ आकाशाकडे ताणते.
तोच व्यायाम आज आपल्याला करायचा आहे.


या व्यायामाचं नाव आहे ‘कॅट स्ट्रेचिंग’!
कसा कराल हा व्यायाम?
1- खाली सतरंजी टाकून तळपाय आणि गुडघ्यावर ओणवे व्हा. 
2- दोन्ही पायांमध्ये आणि हातांमध्ये आपल्या खांद्याइतकं अंतर घ्या.
3- आपली पाठ आता आकाशाच्या दिशेनं सोसेल इतपत ताणा.
3- पाच सेकंद त्याच स्थितीत राहून नंतर पुन्हा मूळ स्थितीत या.
4- आता विरुद्ध दिशेने म्हणजे आपली पाठ जमिनीच्या दिशेनं खाली ताणा.
5- असं पाच-पाच वेळा करा. 
यामुळे काय होईल?
1- आपली पाठ बळकट करण्यासाठी हा अतिशय उत्तम व्यायाम आहे.
2- विशेषत: लोअर बॅकसाठी याचा फारच फायदा होतो. 
3- यामुळे बॉडी छान रिलॅक्स होते.
4- दिवसाच्या कोणत्याही वेळी आणि आळस आलेला आहे, अंग आंबलेलं आह, अशावेळी हा व्यायाम जरूर करून पाहा. एकदम मस्त वाटेल.
बघा, आता यापुढे निसर्गात प्राणी, पशू, पक्षी यांचं आवजरुन निरीक्षण करा. खूप नव्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील.
आज आधी मांजर तर होऊन बघा.
- तुमचीच ‘मनिमाऊ’, ऊर्जा

Web Title: lockdown - exercise at home cat stretching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.